ऑस्ट्रेलिया, 06 फेब्रुवारी : रिपोर्टर फिल्डवर असताना परिस्थिती कोणतीही, ती बातमी तो आपल्यापर्यंत पोहचवत असतो. बातमी देताना जीवाला कितीही धोका असला तरीही तो पत्करतो. मग, दंगल घडली तरीही, पोलिसांचा लाठीमार सुरू असला तरीही किंवा अन्य कोणती धोकादायक परिस्थिती असली तरीही... अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, अशीच एक घटना ऑस्ट्रेलियामध्ये एका महिला रिपोर्टरसोबत घडली.
ऑस्ट्रेलियाच्या एका टीव्ही चॅनेलची ही रिपोर्टर सापाविषयी काही कार्यक्रम करत होती. सर्पोद्यानातला हा साप तिने गळ्यात घातला आणि त्याच्याविषयी माहिती द्यायला लागली, पण तिच्या हातातल्या माइककडे अचानक साप झेपावला आणि....#viralvideo pic.twitter.com/luyjscFDIW
— News18Lokmat (@News18lokmat) February 6, 2020
महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असताना असं काही घडलं की, तिची चांगलीच भंबेरी उडाली. बातम्या पोहचवत असताना किंवा सांगताना प्रेक्षकांना ती पटकन कनेक्ट व्हावी, यासाठी रिपोर्टर विविध क्लुप्त्या करत असतात. पण, अनेकदा ती रिपोर्टरला धोक्यात आणू शकते. ऑस्ट्रेलियामधील नेटवर्क नाईनची महिला रिपोर्टर सारा, सापांच्या सुरक्षतेबद्दलची माहिती देत होती. यावेळी तिनं गळ्यात साप गुंडळला होता. हा साप आकाराने जरी लहान दिसत असला तरीही त्यानं रिपोर्टरची चांगलीच भंबेरी उडवली. साप गुंडाळून रिपोर्टिंग करत असताना सर्व काही ठीक सुरू होतं.
परंतु, अचानक सापानं हालचाल सुरू केली आणि रिपोर्टिंग करणाऱ्या महिलेला थोडी भीती वाटली. ही भीती चेहऱ्यावर जाणू न देता रिपोर्टरने आपली रिपोर्टिंग कॅमेऱ्यासमोर सुरूच ठेवली. दरम्यान, सापाने अचानक रिपोर्टरच्या हातात असलेल्या बुम माईकला डंख मारला. आता मात्र, रिपोर्टर किंचाळली. यावेळी थोडा वेळ तिनं थांबून सापाच्या हालचालीकडे लक्ष दिलं. सापाची हालचाल सुरूच होती. एक वेळा डंख मारून साप थांबला नाही. त्याने तीन वेळा बुम माईकला डंख मारला. बहुधा त्याला रिपोर्टरच्या हातातला बुम माईक आवडला असेल. यावेळी सर्पमित्राने त्याचं लक्ष विचलित करण्याचं प्रयत्न केला. दरम्यान, रिपोर्टरनेही आपली रिपोर्टिंग पूर्ण केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.