सोशल मीडियावर सध्या एक सुंदर फोटो व्हायरल होत आहे. त्यात बर्फच्छादित खोऱ्याच्या मध्यभागी झोपी गेलेल्या स्त्रीसारखी एक आकृती दिसते. या आकृतीला 'द स्लीपिंग लेडी' असं नाव दिलं आहे.
'द स्लीपिंग लेडी' अमेरिकेच्या अलास्का प्रांतात आहे. तिथे या पर्वताला माउंट सुसिटना असे म्हणतात. तो सुमारे 4390 फूट उंच आहे. त्याच्या पश्चिमेला सुसिटना नदी आहे. दुरून पाहिलं तर असं वाटतं की एक स्त्री झोपलेली आहे.
पण खरोखर या पर्वतावरचं बर्फ एवढं रेखीव आहे? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या द स्लीपिंग लेडीच्या चित्रासारखा पर्वत मात्र पृथ्वीतला कोठेही नाही आहे. ही एक डिजिटल कला आहे.
जीन बिहोरेल या कलाकाराने ते साकारलं आहे. त्याच्या कलेची किंमत जवळपास 3000 युरो म्हणजेच 2.65 लाख रुपये ठेवली आहे.