जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...आणि अजय देवगणसारखे एसटी बसचे 'केस' उडाले, गडचिरोलीचा VIDEO तुफान व्हायरल

...आणि अजय देवगणसारखे एसटी बसचे 'केस' उडाले, गडचिरोलीचा VIDEO तुफान व्हायरल

एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल

एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल

गडचिरोलीहुन अहेरीकडे जात असताना चामोर्शी मार्गावर या बसचे छप्पर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस अनेक किलोमीटर धावतच राहिली.

  • -MIN READ Gadchiroli,Maharashtra
  • Last Updated :

महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 26 जुलै : महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात पोहोचणारी गरीब रथ म्हणून लालपरी अर्थात एसटी महामंडळाच्या बसकडे पाहिलं जातं. पण गावागावात पोहोचणाऱ्या एसटी बसचे अनेक वेळा दुरवस्था झालेले व्हिडीओ समोर आले आहे. आता तर छत उडालेल्या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या दक्षिण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरवस्था दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यात अशा अनेक बसेस आहे ज्यात पावसाळ्यात पाणी गळते कुठे पत्रे निघाले आहे. पण आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत या एसटी बस धावताना चक्क छप्पर उडाले आहे.

जाहिरात

गडचिरोलीहुन अहेरीकडे जात असताना चामोर्शी मार्गावर या बसचे छप्पर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस अनेक किलोमीटर धावतच राहिली. जेव्हा बसचे छप्पर उडत आहे असं चालकाला सांगितलं तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर बस पुढे आगारात उभी कऱण्यात आली. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धावत्या एसटी बसचं चाक निखळलं काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरहून येवल्याला जाणाऱ्या एसटी बसचा एक फोटो व्हायरल झाला होता. वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगल्याजवळ बसचं चाक अचानक तुटून पडलं.

News18लोकमत
News18लोकमत

पण रस्ता खराब असल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती. या बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी होते. बसमधले सर्व प्रवासी सुखरूप होते. बसचं चाक निखळल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी केली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवलं, पण बसचा दरवाजा उघडत नसल्यामुळे स्थानिकांच्या मदतीने दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात