जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Love Marriage केलं म्हणून मुलीचं शुद्धीकरण; अर्धनग्न अवस्थेत नर्मदेवर नेलं आणि..

Love Marriage केलं म्हणून मुलीचं शुद्धीकरण; अर्धनग्न अवस्थेत नर्मदेवर नेलं आणि..

Love Marriage केलं म्हणून मुलीचं शुद्धीकरण; अर्धनग्न अवस्थेत नर्मदेवर नेलं आणि..

मुलीच्या वडिलांनी शुद्धीकरणासाठी भयावर पद्धतीचा अवलंब केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 31 ऑक्टोबर : प्रेम विवाह (Love Marriage) करणाऱ्या मुलीसोबत बापाने धक्कादायक कृत्य (Shocking News) केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात मुलीने सख्ख्या बापावर केलेले आरोप वाचून तुम्हालाही धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे दलित मुलासोबत प्रेमसंबंध सुरू होते. एका दलित तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे वडिलांनी मुलीचं शुद्धीकरण केलं. मुलीने त्या मुलासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर वडिलांनी तिला नर्मदेच्या नदीत डुबकी मारायला सांगितली आणि तिचे सर्व केस कापले. या प्रकरणात दलित तरुणीने वडिलाविरोधात पोलासात तक्रार केली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमध्ये (Baitul) दलित तरुणासोबत लग्न केल्या प्रकरणी ओबीसीच्या एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला तिच्या वडिलांनी नर्मदेत स्नान करून शुद्धीकरण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ऑनर किलिंगच्या भीतीने या दाम्पत्याने पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे. हे ही वाचा- शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने दिला जीव; कोल्हापुरातील खळबळजनक घटना बैतूल निवासी अमित अहिरराव नावाच्या तरुणाने गेल्या वर्षी आर्य समाज मंदिरात लग्न केलं होतं. 24 वर्षीय पीडिताने सांगितलं की, 11 मार्च 2020 रोजी बैतूलच्या टिकारी भागात राहणाऱ्या 27 वर्षीय दलित तरुणासोबत तिने लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर पोलिसांच्या मदतीने सासरहून परत बोलवण्यात आलं. यानंतर तिला राजगडला शिकण्यासाठी पाठवण्यात आलं. 28 ऑक्टोबर रोजी ती हॉस्टलमधून पळाली आणि नवऱ्याच्या घरी पोहोचली. तरुणीने आरोप केला आहे की, वडिलांनी 18 ऑगस्ट रोजी तिला नर्मदा नदीवर नेत 4 लोकांसमोर अर्धनग्न करून शुद्धीकरण केलं. नदीत डुबकी लावली, तिला एका पुडीतून काही तरी खाऊ घातलं. तिचे केस कापले. आणि शरीरावर घातलेले कपडे तेथेच फेकून दिले. दलित तरुणासोबत लग्न केल्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं. दलित मुलाला घटस्फोट देऊन दुसऱ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे दाम्पत्याने ऑनर किलिंगची भीती व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात