कोरोनाच्या काळात आतापर्यंतचं देशातील अत्यंत दुर्देवी दृश्य; VIDEO पाहून मनस्ताप होईल!

कोरोनाच्या काळात आतापर्यंतचं देशातील अत्यंत दुर्देवी दृश्य; VIDEO पाहून मनस्ताप होईल!

कोरोना महासाथीत आपण माणुसकीही विसरलोय का?

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मे : देशभरात कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेचा परिणाम ग्रामीण भागांवरही पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने अख्ख्या कुटुंबाचा घास घेतला आहे. मात्र दुसऱीकडे कोरोनाबाबत लोकांमध्ये भीती तर आहेत त्याचबरोबर गैरसमजही निर्माण झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाटेवर मृत झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह काठीने ढकलला जात आहे. आजूबाजूला रडण्याचे आवाजही येत आहे. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता असून राकेश सिहाग नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट केला आहे. जेसीबीमधून हा मृतदेह बाहेर नेला जात आहे. आणि काही अंतरावर खड्ड्यात हा मृतदेह टाकण्यात आला आहे. हे दृश्य अत्यंत दुर्देवी आहे.

हे ही वाचा-Oxygen मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास, उत्तर प्रदेशमधला विदारक Video

यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोरोनानी माणुसकीचा घास घेतला अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठल्या गावातील आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र ही परिस्थितीत अत्यंत भयावह असल्याचं दिसते.

Published by: Meenal Gangurde
First published: May 2, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या