लंडन 2 नोव्हेंबर : आजच्या तरुणाईमध्ये दारु पिणं कॉमन आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे. तुम्ही दारु पित असाल तर तुम्ही खूप कुल किंवा मॉर्डन आहात असा समज लोकांनी मनात करुन ठेवला आहे. परंतू आपण हे विसरुन चालणार नाही की, दारु आपल्या शरिरासाठी वाईट आहे. यामुळे कॅन्सर सारखे मोठे आजार देखील पसरु शकतात. एवढच काय तर एका प्रकरणात दारु प्यायल्यामुळे नाही, पण दारुमुळे एका तरुणीचे प्राण गेले आहेत. या तरुणीसाठी दारु कशी यमराज ठरली हे जाणून तुम्हाला देखील धक्का बसेल. खरंतर या तरुणीच्या बॉयफ्रेंडमुळे तिचा जीव गेला आहे. दारुच्या नशेत त्याला कळलं देखील नाही आणि त्याने आपल्या प्रेयसीचे प्राण घेतले. त्याला जेव्हा हे कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. हे ही वाचा : दोन ‘अडल्ट डॉल’ घेऊन मंदिरात पोहोचला तरुण, यामागचं कारण ऐकून बसेल धक्का एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर गेला. तेथे तो खूप दारू प्यायला. हा व्यक्ती तेथे एक किंवा दोन नव्हे तर चक्कं 24 बिअर प्यायल्या. इतकी दारु प्यायल्या नंतर या तरुणाचा स्वत:वरील ताबा सुटला आणि यानंतर त्या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत संबंध बनवले आणि या दरम्यान असे काही घडले की, त्याच्या गर्लफ्रेंडने जागीच आपला जीव सोडला. सकाळी जेव्हा हा व्यक्ती शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, त्याची गर्लफ्रेंड बेडवर नग्न अवस्थेत पडलेली आहे. हे प्रकरण इंग्लंडमधील डार्लिंग्टनचे आहे. येथे 32 वर्षीय सॅम पायबस हा त्याची गर्लफ्रेंड सोफी मॉसच्या घरी गेले. खरंतर सॅम पायबस विवाहित होता, तसेच सोफी दोन मुलांची आई होती आणि तिचे सॅमसोबत संबंध होते. हे दोघेही एकमेकांशी लैंगिक संबंधात होते. खरंतर त्या रात्री सॅम पायबसने संबंध बनवताना त्याच्या गर्लफ्रेंडच्या मानेवर दबाव टाकला ज्यामुळे तिचा गुदमरुन जीव गेला आणि पायबसला ते कळलेही नाही. नशेच्या अवस्थेत तो झोपला. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला सोफी बेडवर मृतावस्थेत आढळली.
सॅमला हे आठवत नव्हते की, त्याने नक्की असे काय केलं किंवा त्यांच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. त्यानंतर सॅमने पोलिसांना मदतीसाठी धाव घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केले आणि संपूर्ण घटना सांगितली. डेलीमेलच्या अहवालानुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सोफीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तिचे पोस्टमॉर्टम केलं, ज्यामध्ये गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.