Home /News /viral /

भररस्त्यात तरुणाने पत्नीचे कपडे फाडले; संशयातून केली अशी अवस्था, VIDEO पाहून हादराल

भररस्त्यात तरुणाने पत्नीचे कपडे फाडले; संशयातून केली अशी अवस्था, VIDEO पाहून हादराल

यावेळी पतीचे मित्र, आई-वडीलदेखील उपस्थित होते. सर्वांसमोर तरुणाने पत्नीला मारहाण केली.

    मध्य प्रदेश, 13 सप्टेंबर : संशयामुळे अनेक नाती बिघडतात. त्यात पती-पत्नीच्या (Husband and wife Relations) नात्यात संशय आला तर नातं फार काळ टिकू शकत नाही. अशातच मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh Viral Video) एक धक्कादायक बातमी (Shocking News) समोर आली आहे. चरित्रावर संशय घेऊन आलीराजपुरमधील एक महिला आणि तरुणाला जबर मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. अत्यंत धक्कादायक वाटणारा हा व्हिडीओ (Video Viral) अत्यंत घृणास्पद आहे. (The husband tore his wifes clothes off on street shocking VIDEO) यामध्ये पती आपले आई-वडील आणि मित्रांसह महिला आणि तरुणाला दांडक्याने जबर मारहाण करीत आहे. यादरम्या तो महिलेची साडी देखील फेडतो. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यापूर्वीही जिल्ह्यात महिला आणि दोन सख्ख्या बहिणींना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. ही घटना सोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगलगावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने गावातील एक अन्य तरुणासोबत पत्नीला (Extra Marital affair) पाहिलं होतं. यानंतर तो आपले मित्र आणि आई-वडिलांना घेऊन तेथे पोहोचला. यानंतर त्याने महिलेला आणि तरुणाला मारहाण सुरू केली. यावेळी शेजारी उभी असलेली तरुणाची आई त्याला मारहाण्यासाठी उत्तेजन देत होती. यामध्ये त्याचे मित्र आणि वडीलदेखील मदत करीत होते. त्यांनी दोघांना खूप मारलं. इतकच नाही तर त्याने आपल्या पत्नीची साडी सर्वांसमोर फेडली. हा प्रकार अत्यंत लाच्छनास्पद असून यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हे ही वाचा-OMG! एका दुचाकीवर तब्बल 13 जणांनी केला प्रवास; VIDEO पाहून चक्रावून जाल देशभरात विवाहबाह्य संबंधातून गुन्हेदारी वाढत असल्याचं दिसत आहे. अनेकदा रागाच्या भरात हत्येचं पाऊल देखील उचललं जातं. मात्र वेळीत यावर वेसण आणणं गरजेचं आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Sexual assault, Shocking video viral, Wife and husband

    पुढील बातम्या