• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कमाल! Petrol, विजेशिवायच चालवली Bike; पठ्ठ्याने काय केला Jugaad पाहा Video

कमाल! Petrol, विजेशिवायच चालवली Bike; पठ्ठ्याने काय केला Jugaad पाहा Video

एका तरुणाने पेट्रोल, विजेशिवायच बाईक (Bike video) चालवून दाखवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol diesel) किमती (Petrol diesel price) दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर खिशाला परवडत नसल्याने बऱ्याच गाडी चालकांनी आपल्या गाड्या बाजूला ठेवल्या आहेत. काही जणांनी आता सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. तर काही जणांनी इलेक्ट्रिक बाईककडे (Bike drive without petrol) वळले.  पण एका तरुणाने पेट्रोल, विजेशिवायच बाईक (Bike video) चालवून दाखवली आहे. एका बाईकप्रेमी तरुणाने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे बाईक चालवण्याची हौस काही सोडली नाही. त्याने असा जुगाड (Desi Jugaad Viral Video) केला ज्यामुळे त्याला ना पेट्रोलची गरजच पडत ना इलेक्ट्रिक बाईकची. कोणत्याही टेन्शनशिवाय तो बिनधास्तपणे रस्त्यावर बाईक चालवताना दिसला. आता तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की या तरुणाने नेमकं असं केलं तरी काय? ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
  या तरुणाने एका बाईकला सायकलमध्ये बदललं. ज्यामुळे वरून ही  गाडी बाईकसारखी दिसते पण त्याचा खालील भाग मात्र सायकलचा आहे. बाईकचा वरील भाग त्याने आपल्या सायकला जोडला आहे. त्यामुळे ही अनोखी बाईक चालवण्यासाठी त्याला पेट्रोल लागत नाही. तर पँडल मारूनच तो बाईक चालवतो. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी या तरुणाचा त्याच्या अनोख्या बाईकसह व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे वाचा - हिरोगिरी पडली भारी! बाईक स्टंटवेळी झाला भयंकर ब्लास्ट आणि...; धडकी भरवणारा VIDEO पॅरामाऊंट सायकल स्टोर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तरुणाच्या हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: