प्रत्येक व्यक्तीचा वेगळा छंद असतो. मात्र जगभरात अशी अनेक लोक आहेत ज्यांचे काही विचित्र छंद असतात. यातील एका व्यक्तीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
जगात एक असाही व्यक्तीही आहे ज्याने छंदासाठी स्वतःला बदलले. स्वतःचं संपूर्ण शरीर बदलवत त्याने राक्षसासारखं दिसण्यासाठी आपला लूक बदलला.
या व्यक्तीचं नाव फर्नांडो फ्रँको डी ऑलिव्हेरा आहे. ज्याने आपले संपूर्ण शरीर अशा प्रकारे टॅटूने झाकले आहे की देवाने दिलेले रूप पूर्णपणे बदलून टाकलं. स्वत:ला व्हॅम्पायर दाखवण्याची इतकी क्रेझ होती की त्याने जीभ, डोकं सगळंच कापून टाकलं.
फर्नांडो फ्रँको डी ऑलिव्हेरा एवढ्यावरच मन भरलं नाही तर त्याला शरीरावर अजून बरेच काही करायचे आहे असे तो म्हणतो. मीडियाशी बोलताना तो म्हणाला की, मी 2000 सालापासून माझ्या शरीरावर टॅटू बनवायला सुरुवात केली होती.
फर्नांडो फ्रँको डीने स्वतःला व्हॅम्पायरसारखे दिसण्यासाठी प्रथम त्याच्या डोळ्यांवर गोंदवले. याशिवाय त्याचे नाक कापले आणि त्याचे दात व्हॅम्पायरसारखे करुन घेतले.