नवी दिल्ली, 18 मार्च : निष्काळजीमुळे, एखाद्या चुकीमुळे अनेक अपघात घडतात. दिवसेंदिवस अशा अपघातांची संख्या वाढली आहे. अशा अपघातांमध्ये अनेकजण गंभीर गखमी होतात तर काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे गाडी चालवताना किंवा रस्त्यावर चालताना नेहमी सतर्क राहण्यासाठी सांगितले जाते. जेणेकरुन अपघात टळतील. मात्र काहीजण कितीही सांगून काहीतरी चूक करतातच. असा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये तरुणीच्या एका चुकीमुळे तिची बिकट अवस्था झाली.
व्हिडिओमध्ये एक मुलगी हेल्मेट घालून स्कूटी चालवताना दिसत आहे. तिला पाहून ती गाडी उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण मागे-पुढे जाऊन ती स्कूटीला पाठीशी घालत असल्याचे कळते. मग अचानक ती स्कूटीचे ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर फिरवते. त्यानंतर स्कूटीचा ताबा तिच्याकडून निसटतो आणि गाडी थेट समोरील गेटवर जाऊन अडकते. तरुणीलाही काय करावं सुचत नाही. काही वेळातच आजुबाजूचेही लोक तेथे जमा होताना दिसतात.
वाह क्या Entry मारी है दीदी ने 😂❤️ pic.twitter.com/VdFcT11wOO
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) March 16, 2023
हसना जरूरी है नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त लिहेपर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी ही क्लिप पाहिली असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. नेटकरी मुलीच्या ड्रायव्हिंगची मजा घेताना दिसत आहे. अनेक मजेशीर कमेंट व्हिडीओवर दिसत आहेत. अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला.
दरम्यान, यापूर्वीही असे मुलींचे गाडी चालवतानाचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अशा व्हिडीओंना पाहून नेटकरीची चांगलीच मजा घेतात. मात्र कधी कधी अशा अपघातातून अनेकजण गंभीर जखमीदेखील होतात. त्यामुळे गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Social media viral, Video viral, Viral