नवी दिल्ली, 3 मार्च : आपल्या आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही तरी काम करत असतो. प्रत्येकजण 8 ,9 तास नोकरी करत असतो. मात्र कधी कधी वेळेपेक्षा जास्त कामही काहींना करावं लागतं. याविषयी अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्याही घटना समोर आल्या आहेत. बॉस आणि कर्मचाऱ्यांमध्ये बऱ्याचदा कशावरुन ना कशावरुन भांडण होत असतं. अशातच आणखी एका बॉस आणि कर्मचाऱ्यामधील वादाची घटना समोर आली असून याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. सध्या समोर आलेल्या घटनेमध्ये एका महिलेने आपल्या बॉसला ब्लॉक केलं. तिने याविषयी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तिने व्हिडीओमध्ये यामागील कारण शेअर केलंय. महिला आजारी असतानाही तिच्या बॉसने तिला फोन केला ज्यानंतर तिने बॉसला ब्लॉक केलं. या महिलेचं नाव व्हॅनेसा आहे. हेही वाचा - वाघाला पाहून हरीण सुन्न, पुढं जे झालं ते हृदय पिळवटणारं, पाहा VIDEO व्हॅनेसा म्हणाली, मी आजारी होते त्यामुळे सुट्टी घेतलेली. त्याच दिवशी बॉसचा फोन आला. बॉसने ऑफिशिअल नंबरवर फोन न करता महिला कर्मचाऱ्याच्या पर्सनल नंबरवर फोन केला. त्यानंतर महिलेने बॉसला ब्लॉक केलं. तिचं म्हणणं होतं की, एकतर ती सुट्टीवर आहे आणि बॉसला कॉल करायचा होताच तर त्यांनी ऑफिशिअल नंबरवर फोन करायला हवा होता. व्हॅनेसा म्हणाली ती तिच्या ऑफिशिअल नंबरसाठी 4,000 रुपये भरते. व्हेनेसाने ही सर्व घटना यूट्युबर व्हिडीओ शेअर करत सांगितली.
दरम्यान, या कृतीमुळे अनेजण महिलेचं कौतुक करत आहेत. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली असून महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापूर्वीही बॉस आणि कर्मचाऱ्यामधील अनेक घटना समोर आल्या आहेत.