मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पृथ्वी कक्षेपासून सरकणार, सुर्याचाही वाढेल कहर; बाबा वेंगानी येत्या वर्षाची केली भयंकर भविष्यवाणी

पृथ्वी कक्षेपासून सरकणार, सुर्याचाही वाढेल कहर; बाबा वेंगानी येत्या वर्षाची केली भयंकर भविष्यवाणी

पुढच्या वर्षात सौर वादळं येण्याची शक्यता असून त्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज, चुंबकीय क्षेत्र आणि रेडिएशन वाढू शकतं.

पुढच्या वर्षात सौर वादळं येण्याची शक्यता असून त्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज, चुंबकीय क्षेत्र आणि रेडिएशन वाढू शकतं.

पुढच्या वर्षात सौर वादळं येण्याची शक्यता असून त्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज, चुंबकीय क्षेत्र आणि रेडिएशन वाढू शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यामुळेच तर भविष्यवाणी खूप लोकप्रिय असते. काही भविष्यवाणींमध्ये बऱ्याच अंशी सत्यता असते. बल्गेरियामधली महिला बाबा वेंगाची भविष्यवाणी याचसाठी प्रसिद्ध आहे. आता नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ 2 महिने शिल्लक राहिले आहेत. आगामी वर्ष कसं असेल, जगासाठी काय नव्या गोष्टी या वर्षात घडणार आहेत याबाबत बाबा वेंगा यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदापासून ते प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींचं भविष्य बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वी वर्तवलं होतं. 2023 या वर्षाबाबत त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींची चर्चा सध्या होत आहे.

येत्या (2023) वर्षाबाबत बाबा वेंगा यांनी सांगितलेली भयानक गोष्ट म्हणजे 2023मध्ये पृथ्वी तिच्या कक्षेपासून थोडी विचलित होणार आहे. यामुळे पृथ्वीचा तोल ढासळणार नसला तरी हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो. पृथ्वी सूर्याच्या थोडी जवळ गेली, तर रेडिएशन आणि उष्णता वाढेल. सूर्यापासून थोडी लांब गेली तर थंडी वाढेल व रात्रही थोडी मोठी होऊ शकेल. पुढच्या वर्षात सौर वादळं येण्याची शक्यता असून त्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज, चुंबकीय क्षेत्र आणि रेडिएशन वाढू शकतं. कोट्यवधी अणुबाँबच्या स्फोटाएवढी त्याची ताकद असेल. त्याचा सर्वांत मोठा परिणाम तंत्रज्ञानावर होईल.

येत्या वर्षी एखाद्या मोठ्या देशाकडून जैविक अस्त्रांचा शोध लावला जाईल, असं बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं. या प्रयोगामध्ये हजारो नागरिक मृत्युमुखी पडतील, असं त्यांचं भविष्य आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, पुढच्या वर्षी एखाद्या अणुऊर्जा केंद्रात स्फोट होण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधली युद्ध परिस्थिती पाहता, ही गोष्ट खरोखर घडू शकते. या वर्षात मनुष्य मुलांना हवं तसं डिझाइन करून जन्म देऊ शकेल. म्हणजेच जन्माची नैसर्गिक प्रक्रिया वगळता माणसांना प्रयोगशाळेत तयार केलं जाईल.

बाबा वेंगा यांची भारताबद्दल भीतीदायक भविष्यवाणी, वाचा 2 महिन्यांनंतर काय घडणार?

बाबा वेंगा बल्गेरियामध्ये राहत होत्या. अवघ्या बाराव्या वर्षीच त्यांचे डोळे गेले; मात्र त्यानंतर त्यांना भविष्य दिसू लागलं. त्यांनी बांधलेले अंदाज व वर्तवलेलं भविष्य लिहून ठेवलं गेलं आहे. त्यानुसार 2023 या वर्षासाठी त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्याच्या सत्यतेबाबत अनेकांना प्रचिती आल्यामुळे त्यांची भविष्यवाणी लोकप्रिय झाली.

पुढचं वर्ष कसं असेल, याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. जगाच्या दृष्टीनं पुढच्या वर्षात काय चांगलं किंवा वाईट घडेल, याबाबत बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार काही अंदाज बांधले आहेत. आता येणाऱ्या वर्षात त्याची सत्यता कळून येईल.

First published:

Tags: Earth, Nuclear weapons