• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बार्बी डॉलसारखं दिसण्याच्या वेडापायी महिलेने केला 50 लाखांहून अधिक खर्च; आता म्हणते...

बार्बी डॉलसारखं दिसण्याच्या वेडापायी महिलेने केला 50 लाखांहून अधिक खर्च; आता म्हणते...

या महिलेनं केलेला खर्च मोठा आहे. मात्र हे करण्यामागे तिचा उद्देश निराळा आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : बार्बी डॉल ( Barbie Doll) या बाहुलीसारखं आपलं रुप असावं, यासाठी जगातील अनेक महिला वेगवेगळ्या सर्जरी (Surgery) करुन घेतात. यासाठी महिला भरमसाठ खर्च देखील करतात. मात्र, यात अशी एक महिला आहे की जिने या प्रयत्नासाठी आतापर्यंत 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केला, परंतु, अजून प्लॅस्टिक सर्जरी (Plastic Surgery) केलेली नाही. या महिलेनं केलेला खर्च मोठा आहे. मात्र हे करण्यामागे तिचा उद्देश निराळा आहे. स्वतः सारख्या दिसणाऱ्या बार्बी डॉलची क्लोनिंगव्दारे निर्मिती करुन त्या माध्यमातून अवयवदान (Organ Donation) करण्याचा या महिलेचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीला अवयवाची गरज असेल तेव्हा ते सहज उपलब्ध व्हावेत आणि त्या व्यक्तीचा प्राण वाचून त्याचे आयुष्य सुरळीत व्हावे, असा उद्देश यामागे आहे. अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिसमधील 43 वर्षीय मर्सेला नावाच्या महिलेनं बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने यासाठी सुमारे 60,000 पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार विचार केला तर 61 लाख 89 हजार 473 रुपये अक्षरशः उधळले आहेत. मी हा खर्च केवळ कॉस्मॅटिक प्रोसिजरसाठी केला असून अद्याप प्लॅस्टिक सर्जरी केलेली नाही असं तिचं म्हणणं आहे. हे ही वाचा-ऐकावे ते नवल! एकाचं वर्षात ही महिला झाली 2 वेळा गर्भवती; दिला 4 बाळांना जन्म बार्बी डॉल बनू इच्छिते एका मुलाची आई असलेली मर्सेला हिचे तिच्यासारख्या अनेक जिवंत बार्बी तयार करण्याचं स्वप्न आहे. यासाठी ती क्लोनिंगचा (Cloning) आधार घेऊ इच्छिते. यासाठी मर्सेलाने खूप संशोधन केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो येथील प्राध्यापक नकाउची यांच्याशी चर्चा करुन आपल्यासारख्या शेकडो बार्बी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निश्चय मर्सेलाने केला आहे. प्राध्यापक नकाउची रुग्णांच्या शरीरातील स्टेम सेल्सच्या (Stem Cells) आधारे मानवी अवयव विकसित करण्याच्या तंत्रावर काम करीत आहेत. अवयवदानासाठी फौज तयार करु इच्छिते यामागे मर्सेलाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ज्याला गरज आहे, त्याला अवयवदान करता यावे, यासाठी ती आपल्यासारख्या बार्बींची फौज तयार करु इच्छिते. कदाचित तिला स्वतःला या गोष्टीची गरज पडू शकते किंवा अन्य कोणा व्यक्तीला गरज पडल्यास यामाध्यमातून अवयवदान करता येऊ शकते. मानवी अवयव विकसित करण्यासाठी मर्सेला आपल्या स्टेम सेल्स आणि एग्जदेखील (Eggs) दान करणार आहे. अर्थात, या सर्व गोष्टी मर्सेला ज्या उद्देशानं करतीय, त्याला भूतकाळात घडलेली एक घटना कारणीभूत आहे. मर्सेला हिच्या वडिलांचा मृत्यू हा किडनी विकारामुळे झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने अवयव विकसित करण्याच्या पध्दतीबाबत माहिती जमा करण्यास सुरुवात केली होती.
  First published: