मोगा, 26 जानेवारी : पंजाबमधील (Punjab) मोगामध्ये एका नवरदेवाला लग्न न करताच वधुच्या घरातून परत जावं लागलं. याचं कारण ऐकून तर अनेकांना धक्काच बसला. त्याचं झालं असं की जेव्हा लग्नासाठी नवरदेव नवरीच्या घरी पोहोचला तर तिच्या घराला टाळं होतं आणि वधुचं अख्खं कुटुंब गायब झालं होतं. नवरदेवाने या प्रकरणाची रितसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. नवरीच्या कुटुंबाने असं का केलं, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हरजिंदर सिंह याचं लग्न 4 आठवड्यापूर्वी रेडवा गावातील एका तरुणीसोबत झाली होती. लग्नाच्या एक दिवसांपूर्वी शगुनचा विधीदेखील पूर्ण झाला होता. लग्नाच्या दिवशी कोणीतरी नवरदेवाच्या कुटुंबाला सांगितलं की, यापूर्वीच तरुणीचं लग्न झालं होतं. सांगितलं जात आहे की, तरुणीने कोर्ट मॅरेज केलं होतं. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी त्या वेळी तरुणी अल्पवयीन असल्याकारणाने मुलीच्या पहिल्या पतीला शिक्षा झाली होती.
हे ही वाचा-नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट
वधु गायब
सांगितलं जात आहे की, याशिवाय नवरदेव संपूर्ण वऱ्हाड्यांसोबत लग्न करण्यासाठी वधुच्या घरी पोहोचला. मात्र तेथे पोहोचताच आनंदाचं वातावरण गोंधळात बदललं. घराला टाळं लावलं होतं. आणि जेव्हा त्या लोकांनी फोनवरुन मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर फोन स्विच ऑफ असल्यास दिसलं. वराच्या कुटुंबीयांनी वधुच्या कुटुंबाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.