जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट

नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट

नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट

डेंग प्राव्हाटोउडॉम (Deng Pravatoudom) या महिलेला जॅकपॉट लागला आहे आणि तो ही तिच्या नवऱ्याला 20 वर्षांपूर्वी पडलेल्या एका स्वप्नामुळे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जानेवारी: हिंदी सिनेमात आपण अनेकदा ऐकलं असेल की ‘भगवान देता हैं, तब छप्पर फाड के देता हैं…’ असंच काहीसं कॅनडामधील महिलेबरोबर झालं आहे. टोरंटोमधील  डेंग प्राव्हाटोउडॉम (Deng Pravatoudom) ही महिला गेली 20 वर्ष एकाच क्रमांकाने लॉटरी विकत घेत होती. गेली 20 वर्ष ती या एकाच क्रमांकाचं लॉटरी खेळत होती, आणि शेवटी यावर्षी तिला यश मिळालं आहे. थोडेथोडके नाहीत तर तिने तब्बल 340 कोटींचा लोट्टो मॅक्स जॅकपॉट जिंकला आहे. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. गेली अनेक वर्ष ती खेळते आहे पण या एका क्रमांकामुळे तिचं नशिब फळफळलं आहे. नवऱ्याच्या स्वप्नात आला होता लॉटरी नंबर स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय डेंग प्राव्हाटोउडॉमने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, तिच्या नवऱ्याने लॉटरीच्या नंबरबाबत 20 वर्षांपूर्वी लॉटरीनंबरबाबत स्वप्न पाहिलं होतं. त्याच नंबरने ती गेली 20 वर्ष लॉटरी खेळत होती,आता तिला जॅकपॉट लागला आहे. (हे वाचा- आईच्या मायेला तोड नाहीच! कुशीत घेऊन कुत्र्यानं मांजराला पाजलं दूध; VIDEO VIRAL ) डेंग तिच्या 14 भावंडाबरोबर कॅनडामधून लाओस याठिकाणी स्थलांतरित झाले होते. त्या असं सांगतात की त्यांच्या नवऱ्याने 40 वर्ष मजूरी केली आणि खूप कष्टामध्ये सर्व परिवाराला सांभाळले आहे. संपूर्ण जग फिरण्याचं आहे स्वप्न जवळपास 340 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकल्यानंतर डेंग तिची अनेक स्वप्न पूर्ण करणार आहे. यामध्ये जग फिरण्याचं हे तिचं महत्त्वाचं स्वप्न आहे. डेंग आणि तिचं कुटुंब या लॉटरीमुळे खूप आनंदी आहेत. तिने आणि तिच्या नवऱ्याने यानंतर घर खरेदी करण्याच देखील विचार केली आहे. शिवाय त्यांची उधारी चुकती करून मुलांना देखील काही पैसे देण्याचा त्यांचा विचार आहे. कोरोना पँडेमिकनंतर जग फिरण्याचा डेंगचा विचार आहे. (हे वाचा- VIDEO : गायिकेने असा छेडला सूर, कुत्रा-मांजरांपासून माणसांची झाली अशी अवस्था ) केरळमध्ये देखील घडली अशीच घटना अशीच एक घटना केरळमधील एका व्यक्तीबरोबर देखील घडली होती. केरळमधील कोल्लम याठिकाणी राहणाऱ्या एका इसमास 12 कोटींची लॉटरी लागली आहे. 46 वर्षीय ही व्यक्ती आखाती देशांमध्ये काम करून 2013 मध्ये केरळमध्ये परत आली होती. त्यानंतर त्याने याठिकाणी लॉटरी खरेदी करण्याचे आणि विकण्याचे काम सुरू केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात