नवरी नाचण्यात गुंग; भरधाव गाडीनं वऱ्हाड्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा VIDEO

नवरी नाचण्यात गुंग; भरधाव गाडीनं वऱ्हाड्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा VIDEO

नवरी नाचत असल्याने काही जण तिचे व्हिडिओ काढत होते, तेवढ्यात एक भरधाव गाडी आली आणि...

  • Share this:

मुजफ्फरनगर, 18 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी कारच्या सनरुफवर डान्स करीत असताना दिसत आहे. यादरम्यान एक भयंकर अपघात झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तर प्रमोद नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आनंदाच्या क्षणी लोकांमध्ये शोक

ही घटना मुजफ्फरगरमधील नाई बाजाराजवळील आहे. मिळालेल्या माहितीमुसार गावातील बहादुरपूरमधील पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अंशुल यांची वरात शेननगरमध्ये आली होती. वरातीत आनंदाच वातावरण होतं. लोक मनसोक्त नाचत होते. मात्र काही क्षणात हे वातावरण पालटून गेलं व आनंदाचं रुपांतर शोकात झालं. वरात हायवेवरुन चालली होती.

हे ही वाचा-काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुफान राडा; मारहाणीचा धक्कादायक VIDEO आला समोर

यादरम्यान नवरी कारच्या सनरुफवर डान्स करीत होती. नवरी नाचत असल्याचं पाहून अनेक जण कारच्या जवळ आले. यादरम्यान विरुद्ध दिशेने एक कार अत्यंत जलद गतीने येत होती. नियंत्रण सुटल्याने कार वऱ्हाड्यांना चिरडून पुढे निघून गेली. यावेळी घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला. त्याशिवाय 12 हून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर वऱ्हाड्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 18, 2021, 4:32 PM IST

ताज्या बातम्या