मराठी बातम्या /बातम्या /Viral /सिंहाच्या जबड्यात माकडीणीचा मृतदेह, वाहत्या रक्तात पिल्लाने आईच्या पोटाला घट्ट कवटाळलं

सिंहाच्या जबड्यात माकडीणीचा मृतदेह, वाहत्या रक्तात पिल्लाने आईच्या पोटाला घट्ट कवटाळलं

फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत. जगण्यासाठी प्राणी शिकार करतात आणि हा तो क्षण आहे जो मृत्यू जीवनासाठी आवश्यक असल्याचं सिद्ध करतं.

फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत. जगण्यासाठी प्राणी शिकार करतात आणि हा तो क्षण आहे जो मृत्यू जीवनासाठी आवश्यक असल्याचं सिद्ध करतं.

फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत. जगण्यासाठी प्राणी शिकार करतात आणि हा तो क्षण आहे जो मृत्यू जीवनासाठी आवश्यक असल्याचं सिद्ध करतं.

वाइल्डलाइफ फोटोग्राफी (Wildlife Photography) खूप कठीण काम असतं. वाइल्डलाइफ फोटोग्राफरना बऱ्याच प्रतीक्षेनंतर मनासारखे फोटो क्लिक करण्याची संधी मिळते. तुम्ही असे अनेक फोटो पाहिले असतील ज्या जंगली प्राण्यांचे असे क्षण कैद केले जातात, ज्यावर आपण विश्वासही ठेवू शकत नाही.

यामध्ये साउथ अफ्रिकाचे (South Africa) फोटोग्राफिक सफारी गाइड हेंड्री वेंटरने आपले काही क्लिक्स शेअर केले आहेत. यामध्ये एक सिंह आणि सिंहिणीने माकडीणीचा शिकार केल्याचा क्षण कैद केला आहे. हे फोटो साउथ आफ्रिकेच्या जीमंगा प्राइवेट गेम रिजर्व (Zimanga Private Game Reserve) च्या काही अंतरावरुन कैद करण्यात आले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये एक असहाय्य माकडीण शिकारीनंतर सिंहाच्या तोंडात दिसत आहे. या फोटोमध्ये माकडीणीच्या पिल्लाने असाहाय्यपणे आपल्या आईच्या पोटाला कवटाळलं आहे.

400 पौंडाच्या या सिंहाच्या तोंडात आपल्या आईच्या मृतदेहाला पाहून बाळाच्या चेहऱ्यावरील भीती अस्वस्थ करते. ही सर्व घटना अवघ्या 1 मिनिटाच्या आत घडली. जेव्हा भूकेल्या सिंहाने धावत माकडीणीला आपल्या जबड्यात घेतलं. मात्र यादरम्यान सिंहाने बहुतेक माकडीणीच्या पोटाशी चिकटलेल्या पिल्लाला पाहिलं नाही.

शेअर केलेल्या फोटोमधील एका फोटोत माकडीणीचं असाहाय्य पिल्लू कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. त्याचा आईच्या अंगातून रक्त वाहत होतं आणि तो सिंहाच्या जबड्यात कैद होता. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये सिंह पिल्लाला हटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना फोटोग्राफरने लिहिलं होतं की, तब्बल 7 सिंह कोणाचा तरी पाठलाग करीत होते. त्यावेळी एका सिंह जबड्यात माकडीणीला घेऊन येताना दिसला. हे पाहताच फोटोग्राफरने कॅमेरा घेतला आणि फोटो क्लिक करू लागला.

माकडीणीचं पिल्लू आईच्या मृतदेहाला कवटाळून बसला आहे. हे पाहून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल. पिल्लू आपल्या आईला सोडायला तयार नव्हता. सिंहाच्या टोळीमधील आणखी एका सिंहाला मांसाचा तुकडा हवा होताय अशात त्याने पिल्लाला तोंडात घेत मारून टाकलं.

हे ही वाचा-57 वर्षीय व्यक्तीचं घोडीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून मालकीणीला बसला धक्का

आपल्या या फोटोबद्दल बोलताना हेंड्रीने लिहिलं आहे की, निसर्ग खूप सुंदर आहे. येथे जन्म आणि मृत्यूमध्ये युद्ध सुरू असतं. जगण्यासाठी प्राणी शिकार करतात आणि हा तो क्षण आहे जो मृत्यू जीवनासाठी आवश्यक असल्याचं सिद्ध करतं.

First published:
top videos