मराठी बातम्या /बातम्या /Viral /सर्पमित्राच्या घरी विषारी नागिणीचा पाळणा हलला; 18 पिल्लांना खेळवतानाचा VIDEO आला समोर

सर्पमित्राच्या घरी विषारी नागिणीचा पाळणा हलला; 18 पिल्लांना खेळवतानाचा VIDEO आला समोर

सर्पमित्राच्या घरातील हे VIDEO पाहून तुम्हीही अवाक व्हाल...

सर्पमित्राच्या घरातील हे VIDEO पाहून तुम्हीही अवाक व्हाल...

सर्पमित्राच्या घरातील हे VIDEO पाहून तुम्हीही अवाक व्हाल...

मुंबई, 17 जुलै : प्राणी आणि माणसामधील नातं कधी प्रेमाचं तर कधी भीतीचं असतं. मात्र जेथे भीती असते तेथे प्रीती नसते या वचनाचा विचार केला तर प्राण्यांसोबत तुम्ही प्रेमाने वागलात तर ते तुम्हाला कधीच त्रास देऊ शकत नाही. साप आणि माणसामधील मित्रत्वाचं उदाहरण चेंबुरमध्ये पाहायला मिळालं आहे. चेंबूरमधील वाशिनाका येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात नागिणीच्या 18 पिलांचा जन्म झाला आहे. याचे काही व्हिडीओ (video viral ) समोर आले आहेत.

सर्पमित्र अमान खान याने चेंबूर मधील एका गरोदर नागिणीची सुटका केली होती. यावेळी घटनास्थळी ही नागिण अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आली होती. त्यावेळी तिला हालचाल करणे देखील शक्य नव्हते. त्यामुळॆ अमान याने या नागिणीला काही वेळा करीता आपल्या चेंबूर येथील घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (The birth of 18 baby herpes at Sarpamitras house at Vashinaka in Chembur)

घरी नेताच त्या नागिणीने 18 अंडी दिली. यावेळी नागिण अत्यंत अशक्त असल्यामुळे तिला उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र अमान यानॆ तिची 18 अंडी घरातच कृत्रिमरित्या उबविल्यानंतर मागील आठवड्यातच त्या अंड्यांमधुन 18 पिल्ले बाहेर आली. या सर्व पिलांची प्रकृती सुदृढ आहे. अमान याने वनविभागला याची माहिती देत या अठरा पिल्लांना सुखरूप नैसर्गिक आधिवासात सोडण्यात आले आहे.

हे ही वाचा-दारूडं माकड! ऐटीत झाकण उघडत तोंडाला लावली बाटली; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे

सर्प हा माणसाचा मित्र आहे. तो स्वत:हून कधीच इजा पोहोचवत नाही. सापाच्या विषापासून प्रतिविषे तयार केली जातात. विषारी साप नष्ट झाले तर अशी औषधे तयार करायची कुठून, ही समस्या उभी राहील. ही बाब लक्षात घेऊन सापांना जीवदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असं सर्पमित्रांकडून सांगितलं जातं.

साप दिसल्यास काय करावे

साप दिसल्यास त्वरित 1926 हॅलो फॅारेस्ट या क्रमांकावर संपर्क करावे. फायरब्रिगेड व स्थानिक सर्पमित्रांना संपर्क करावे असे आवाहन सर्पमित्र - अभिलाष डावरे यांनी नागरिकांना केले आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Snake, Viral video.