मुंबई, 30 जून- अभिनेत्री असो की मॉडेल त्यांचं सौंदर्य ही त्यांच्यासाठी देणगी असते, ते टिकवण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते, त्यासाठी प्लास्टिक सर्जरी (Plastic Sergery) सारख्या गोष्टी बहुतांश जणी करत असतात, अलीकडेच प्लास्टिक सर्जरी केल्याने एका अभिनेत्रीला जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिच्या बाबतीतही धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वातीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपली व्यथा मांडली. या प्रकारानंतर तिने, कोणत्याही आजारासाठी नेहमी तज्ज्ञांकडे जा, क्लिनिकला भेट देऊ नका, असा सल्ला आपल्या फॅन्सना दिला आहे.कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिच्या सोबत जे काही घडलं ते भयावह आहे. रूट कॅनल (Root Canel) या दातांच्या शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा सुजला आहे, अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे, स्वातीच्या चेहऱ्याची बिघडलेली स्थिती पाहून ते नाराज झाले आहेत. स्वातीने सांगितले की, तिच्या दातांची रूट कॅनल सर्जरी होऊन 30…31 दिवस झाले असून, अजूनही तिला हसता येत नाही. रूट कॅनल केल्याने तिचा उजवा गाल आणि ओठ सुजले आहेत. बरे होण्यासाठी आणखी 2 आठवडे किंवा 1 महिना लागू शकतो, असं तिनी सेंकड ओपनियन घेतलेल्या डॉक्टरनी सांगितल्यानतंर ती खूपच हताश झाली आहे. खराब चेहऱ्यामुळे तिची नोकरी गेली असून, अनेक ऑर्डर्स, मॉडेलिंग असाइनमेंट्स, मालिका आणि चित्रपट तिने गमावले आहेत.या घटनेची संपूर्ण माहिती देताना स्वाती म्हणाली की,`` मी 28 मे 22 ला रूट कॅनल उपचारांसाठी गेले होते. माझं रूट कॅनल पूर्ण झालं नव्हतं. चेहऱ्यावर सूज आल्याने ते अपूर्णच राहिलं. शस्त्रक्रियेबाबत अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा मी सेकंड ओपिनियन घेतलं. तेव्हा त्या डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला की, माझ्या पहिल्या डॉक्टरांनी मला पहिल्यांदा सोडियम हायपोक्लोराईटचे (Sodium Hypochlorite) इंजेक्शन दिलं. हे इंजेक्शन देताना मी मोठ्याने ओरडले, रडले. यानंतर त्यांनी भूलीचं इंजेक्शन दिलं.दुसऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आधी भूल देण्याचं आणि मग सोडियम हायपोक्लोराईटचं इंजेक्शन द्यायला हवं होतं. ती म्हणते, होय, डॉक्टरांनी चूक केली; पण मी जेंव्हा ओरडले तेव्हा डॉक्टरांनी सेलिनचं इंजेक्शन दिलं असतं तर एवढी सूज आली नसती. मी घरी जाऊन झोपले आणि सकाळी उठल्यानंतर माझा चेहरा पूर्णपणे सुजला होता.
(हे वाचा:
Shocking! किडनी स्टोनवर उपचारासाठी रुग्णालयात गेली तरुणी आणि अचानक जन्माला आलं बाळ
) स्वाती म्हणाली की, आता मी पूर्णपणे बरी होत आहे, पण माझे ओठ योग्य आकारात येत नाहीत. मला नीट हसता येत नाही. पूर्ण बरं होण्यासाठी साधारण एक महिना लागू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार का? यावर ती म्हणाली की, मी या संपूर्ण प्रकरणावर कुटुंबीयांशी चर्चा करेन, कारण कोर्टात गेले तर हे प्रकरण दोन वर्षं पुढे जाईल. कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत आहे. दरम्यान, स्वातीची सर्जरी करणाऱ्या डॉक्टरनी स्वतःचा बचाव केला आहे, इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी सांगितले की, अभिनेत्रीने बिनपुराव्याचे आरोप केले आहेत. वेळोवेळी तिची विधानं बदलत आहेत. जे काही झालं ते रूट कॅनाल उपचारांच्या गुंतागुंतीमुळे होतं, कोणत्याही वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नाही. आता स्वातीचा चेहरा लवकर पूर्वपदावर येऊन तिने कामाला सुरूवात करावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.