Home /News /lifestyle /

Shocking! किडनी स्टोनवर उपचारासाठी रुग्णालयात गेली तरुणी आणि अचानक जन्माला आलं बाळ

Shocking! किडनी स्टोनवर उपचारासाठी रुग्णालयात गेली तरुणी आणि अचानक जन्माला आलं बाळ

ज्या पाठदुखीचं कारण ही तरुणी किडनी स्टोन समजत होती ते खरंतर प्रेग्नंट असल्यामुळे झालेलं लेबर पेन होतं.

    वॉशिंग्टन, 29 जून : प्रत्येकाला कधी ना कधी पाठदुखीची समस्या उद्भवते. पाठीतील वेदनांची कारणे वेगवेगळी असतात (Back pain due to pregnancy). त्यापैकीच एक म्हणजे किडनी स्टोन. पाठीच्या वेदनेने अशीच त्रस्त असलेली एक महिलाही आपल्याला किडनी स्टोन झाला असावा असं समजून रुग्णालयात गेली आणि घरी परतली ती हातात नवजात बाळ घेऊन. त्यानंतर या महिलेलाही धक्का बसला आहे (Baby born without pregnancy symptoms). महिलेने आपल्या प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. टिकटॉकवर तिने व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिला प्रेग्नन्सीबाबत काहीच माहिती नव्हती. पाठीत वेदना सुरू झाल्या आणि अचानक तिने एका बाळाला जन्म दिला. तिलाही तिच्या प्रेग्न्सीबाबत तेव्हाच समजलं. कायलाने सांगितलं की, माझ्या पाठीत वेदना होत होत्या. पाठीतील वेदनेचं कारण किडनी स्टोन असावं असं वाटलं. त्यावर उपचारासाठी म्हणून डॉक्टरांकडे गेले. तिथं डॉक्टरांनी जे कारण सांगितलं ते ऐकून धक्काच बसला. रिपोर्टनुसार वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कायला प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. ती 38 आठवडे म्हणजे 9 महिन्यांची प्रेग्नंट होती. कायला म्हणाली, प्रेग्न्सीची लक्षणं कशी असतात हे मला माहिती नव्हतं. वेदना होत असल्यासारखं वाटत होतं. डॉक्टरांनी त्या वेदना म्हणजे लेबर पेन असल्याचं सांगितलं. हे वाचा - ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; पोटात दुखू लागलं आणि 20 वर्षांच्या तरुणीने अचानक दिला बाळाला जन्म यानंतर तिची डिलीव्हरी करण्यात आली. तिने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी ती 21 वर्षांची होती. नवजात बाळासह ती घरी परतली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही युझर्सनी हे कसं शक्य आहे, असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर एका अशी प्रेग्नन्सी भयावह असल्याचं म्हटलं आहे. काहींनी यावर मजेशीर कमेंटही दिल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant

    पुढील बातम्या