तेलंगणा, 10 मार्च : विचित्र घटना किंवा काही खास कारणामुळे एखादा विवाहसोहळा जोरदार चर्चेत येतो. बऱ्याचदा विवाहसोहळ्यासाठी केलेला खर्च, वर-वधूचा पेहराव, विवाहस्थळ किंवा विवाहाशी संबंधित खास प्रथा-परंपरांमुळे एखादा विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरतो. सध्या असाच एक विवाहसोहळा जोरदार चर्चेत आहे. तेलंगणमधल्या एका आदिवासी व्यक्तीने एका वेळी दोन महिलांशी केलेला विवाह चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा सोहळा बुधवारी रात्री (8 मार्च) भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातल्या एका गावात पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या विवाहामागची कहाणी रंजक आहे. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. काही आदिवासी समुदायांमध्ये एका व्यक्तीने एकाच वेळी दोन महिलांशी विवाह करणं ही बाब स्वीकारार्ह आहे. याच अनुषंगाने तेलंगणमध्ये नुकताच एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. तिथल्या एका आदिवासी व्यक्तीने एका वेळी दोन महिलांशी विवाह केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो त्या महिलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. हा विवाहसोहळा बुधवारी रात्री भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातल्या एका गावात पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते. येराबोरू गावातल्या एम. सत्तीबाबू याचे दोन वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या स्वप्ना आणि सुनीता यांच्याशी प्रेमसंबंध होते. या व्यक्तीपासून सुनीताने एका मुलाला आणि स्वप्नाने मुलीला जन्म दिलेला आहे. या विवाहावरून दोन्ही महिलांच्या कुटुंबात जोरदार भांडणही झालं होतं; मात्र, सत्तीबाबूने त्या दोघींशी लग्न करणार असल्याचं कुटुंबीयांना पटवून दिलं. OMG! 9 महिने नव्हे तब्बल 9 वर्षे ‘प्रेग्नंट’ होती महिला; पोटातील बाळाला पाहून डॉक्टरही हैराण त्यानंतर सत्तीबाबूने दोन्ही वधूंची नावं असलेली विवाहाची निमंत्रण पत्रिका छापली. ती व्हायरल होताच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गावात पोहोचले. हा प्रकार समजल्यावर अधिकारी हा विवाह सोहळा रोखू शकतात, अशी भीती या तिन्ही कुटुंबांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी नियोजित वेळेच्या काही तास अगोदरच विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. हा विवाहसोहळा गुरुवारी सकाळी होणार होता. मात्र लग्नाची बातमी पसरल्याने तीन कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणाताही त्रास होऊ नये, यासाठी नियोजित वेळेपूर्वी विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, 2021मध्ये तेलंगणमधल्या आदिलाबाद जिल्ह्यातल्या एका आदिवासी व्यक्तीने त्याच्या मावशीच्या दोन मुलींशी एका वेळी लग्न केलं होतं. अर्जुन नावाच्या आदिवासी व्यक्तीचे उषाराणी आणि सुरेखा या दोन महिलांशी प्रेमसंबंध होते. दोघींसोबत चार वर्ष डेटिंग केल्यानंतर त्याने एकाच मांडवात दोघींशी विवाह केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







