मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोरोनापासून वाचण्यासाठी केला भयंकर उपाय; त्याने चक्क खाल्ला कच्चा विषारी साप आणि...

कोरोनापासून वाचण्यासाठी केला भयंकर उपाय; त्याने चक्क खाल्ला कच्चा विषारी साप आणि...

कोरोनापासून बचावासाठी साप खाताना या व्यक्तीचा (Man eat snake) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

कोरोनापासून बचावासाठी साप खाताना या व्यक्तीचा (Man eat snake) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

कोरोनापासून बचावासाठी साप खाताना या व्यक्तीचा (Man eat snake) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

  • Published by:  Priya Lad

हैदराबाद, 28 मे : आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेतो आहे. पण काही लोक कोरोनापासून बचावाचा विचित्र आणि भयंकर असा उपाय करत आहे. असे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल (Social media viral video) होत आहे. अशाच व्हिडीओपैकी एक अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ. ज्यात एका व्यक्तीने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुसरं तिसरं काही नाही तर चक्क विषारी साप चावून खाल्ला आहे (Man eat snake to keep covid-19 at bay).

तामिळनाडूच्या मदुराईतील ही धक्कादायक घटना आहे. एका व्यक्तीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो सापाला खाताना दिसतो (Tamilnadu man eat snake) आहे. साप हा कोरोनावर अँटिडॉट म्हणून उत्तम आहे, असा दावा त्याने केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

हे वाचा - VIDEO : कोरोनामध्ये क्रिएटिव्हीटीने गाठला नवा स्तर, देशी जुगाडचा भारी नमुना

या व्यक्तीचं वय 50 असून त्याचं नाव वाडिवेल असल्याचं सांगितलं जातं आहे. तो तिरुनेलवेली जिल्ह्यातील पेरूमलपट्टीचा रहिवाशी आहे.  वाडिवेलनेने शेतात एक साप पकडला, त्याला मारलं आणि कोरोनावरील उपचार असल्याचं सांगत तो कच्चा खाला. त्यावेळी त्याच्या मित्राने व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

कोरोनाबाबत व्हिडीओच्या माध्यमातून असा विचित्र सल्ला देणं याला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  वडीपट्टीमध्ये गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 7,500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

हे वाचा - VIDEO - प्राण जाए पर चाय ना जाए! पोलिसापासून स्वतःला नाही, चहाला वाचवण्याची धडपड

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मदुराई जिल्ह्यातील वन अधिकारी एस आनंद यांनी सांगितलं की, ही व्यक्ती इतरांनासुद्धा असं करण्यासाठी प्रवृत्त करत होती. खोटे आणि चुकीचे दावे केले आहेत. सुदैवाने या व्यक्तीने सापाची विषग्रंथी चावली नाही. नाहीतर त्याच्यासाठी ती विषारी ठरली असती.

First published:

Tags: Corona, Coronavirus