मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: कोरोनामध्ये नागरिकांच्या क्रिएटिव्हीटीने गाठला नवा स्तर, देशी जुगाडचा आतापर्यंतचा सर्वात भारी नमुना

VIDEO: कोरोनामध्ये नागरिकांच्या क्रिएटिव्हीटीने गाठला नवा स्तर, देशी जुगाडचा आतापर्यंतचा सर्वात भारी नमुना

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक काय काय जुगाड शोधून काढतील याचा काही नेम नाही.

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक काय काय जुगाड शोधून काढतील याचा काही नेम नाही.

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक काय काय जुगाड शोधून काढतील याचा काही नेम नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसशी सामना करीत आहे. देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या भयंकर अशा विषाणूमुळे लोक आपल्या घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवत आहेत. दुसरीकडे मात्र लोक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना, नवनव्या क्लृप्ता आणत आहेत. काही जणं तर कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी चित्र-विचित्र देशी जुगाडही करीत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि फेस मास्क (Face Mask) सारख्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अधिकतर लोक या नियमाचं पालन करीत आहे. मात्र अशा या संकटाच्या काळात काही मजेशीर व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये या व्यक्तीनी जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हा शोध तर कोणी संशोधकही करू शकणार नाही.

हे ही वाचा-VIDEO लग्नात मंत्रोच्चार करता करता दमले गुरुजी; तर वधु-वरांनी मंडपात केला प्रताप

ट्विटरवर हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती बाईकवर एकमेकांपासून बरंच अंतर ठेवून बसले आहेत. आणि त्यांनी आपली बाईक प्लास्टिकने कव्हर केली आहे. हा व्हिडीओ लोकांना आवडला आहे.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Viral video.