जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या वाढदिवशी बायकोनं दिलं असं गिफ्ट, नवराही थक्क

लग्नाच्या वाढदिवशी बायकोनं दिलं असं गिफ्ट, नवराही थक्क

लग्नाच्या वाढदिवशी बायकोचं अनोखं गिफ्ट

लग्नाच्या वाढदिवशी बायकोचं अनोखं गिफ्ट

अनेक नवरा बायको आपल्या खास दिवशी एकमेकांना खास गिफ्ट देतात. लग्नाचा वाढदिवस असल्यावर ऐकमेकांसाठी गिफ्ट घेतात. आपल्या साथीदाराला अनेक निरनिराळे गिफ्ट दिल्याच्या घटना आत्तापर्यंत समोर आल्यात.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 मे : अनेक नवरा बायको आपल्या खास दिवशी एकमेकांना खास गिफ्ट देतात. लग्नाचा वाढदिवस असल्यावर ऐकमेकांसाठी गिफ्ट घेतात. आपल्या साथीदाराला अनेक निरनिराळे गिफ्ट दिल्याच्या घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. अशातच यामध्ये भर पडली असून एका महिलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नवऱ्याला दिलेल्या गिफ्टविषयी चर्चा रंगली आहे. पत्नीने लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या पतीला विजयाची भेट दिली आहे. नागरी निवडणुक जिंकत महिलेनं लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याला ही भेट दिली. ही घटना उत्तरप्रदेशातील असून सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. हेही वाचा -  मैत्रिणीनेच मैत्रिणीला फसवलं, तिच्या बाळासोबत केलं धक्कादायक कृत्य उत्तर प्रदेशातील नागरी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने कानपूर महानगरात महापौरपदावरही विजय मिळवला आहे, तर कानपूर महानगरपालिकेच्या सर्व 110 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, तर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि अनेक अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. हेही वाचा -  स्विमिंग पुलमधील मजामस्ती आली अंगलट; काही सेकंदात घडलं धक्कादायक, Viral Video या महिलेचं नाव तबस्सुम असीम असून या काँग्रेस पक्षाच्या वतीने वॉर्ड क्रमांक 97 मधून नगरसेवक निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. याआधी त्यांचे पती या भागातील नगरसेवक होते. मात्र महिलांची जागा उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी येथून पत्नीला उमेदवारी दिली. 13 मे रोजी त्यांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव होता. निकाल आला तेव्हा दोघेही खूप खुश दिसत होते. पत्नीने सांगितले की, ही तिच्याकडून तिच्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाची भेट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात