नवी दिल्ली, 15 मे : प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हे खूप खास असतात. मित्राचा आपल्या आयुष्यात महत्त्वाचा रोल असतो. कोणतीही अडचण आली किंवा छोट्यातली छोटी गोष्ट शेअर करण्यासाठी तुम्हाला मित्राची गरज भासते. त्यांच्यासोबत कोणतीही गोष्ट शेअर केल्याने मन हलकं होतं. मात्र कधी कधी जीवाभावाच्या मैत्रीतही अनेकांना धोका मिळतो. मित्रच मित्राची फसवणूक करतात. अशा बऱ्याच घटना पाहिल्या मिळाल्या आहेत. अशातच मैत्रीत फसवणून केल्याची आणखी एक घटना घडली असून ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच एका महिलेलनं तिच्यासोबत झाल्या फसवणीकीची घटना शेअर केली आहे. तिनं मैत्रित गळा घोटला गेल्याची घटना लोकांसोबत शेअर केलीय. या महिलेनं सोशल मीडियावर तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवून आपल्या वेदना शेअर केल्या आहेत. तिनं सांगितलं की, खूप विश्वास ठेऊन आपल्या मुलाला मित्राकडे सोडले होते. पण तिने विश्वासाचा गळा दाबला. ती पुढे म्हणाली की आता कदाचित ती कोणावरही विश्वास ठेवू शकणार नाही.
महिला म्हणाली ती आपल्या मुलांची चांगली काळजी घेते. इतर कोणालाही मुलांचे चुंबन घेऊ देत नाही. जेणेकरून त्यांना संसर्ग होणार नाही. मात्र हे जाणून तिच्या मैत्रिणीने मुलाला दूध पाजले. तेही न सांगता. सोशल मीडियावर अनेक लोक महिलेच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी सांगितले की हे चुकीचे आहे.तर काहींनी सांगितले की काकू आईसारख्या असतात. यात काही गैर नाही. ती फालतू नाटक करत आहे. हेही वाचा - डोळ्यांवर पट्टी बांधून केस कापतात, महिलाही आहेत चाहत्या, हटके स्टाईलची सर्वत्र चर्चा ही महिला मलेशियन असून तिच्यासोबतची ही घटना टिकटॉक या सोशल मीडिया साइटवर शेअर केली. तिनं सांगितलं की तिच्या मैत्रिणीनं तिची एकदा नव्हे तर दोनदा फसवणूक केली. या फसवणुकीने महिलेचे कंबरडे मोडले आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. दरम्यान, मैत्रीविषयी चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना समोर येत असतात. कधी जीवाभावाच्या मैत्रितही अनेकांना धोका मिळतो. ज्यामुळे त्यांना पुढे कोणावर विश्वास ठेवणंही कठिण होऊन जातं.

)







