जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News: असं ठिकाण जिथे 24 तास असतो दिवस; सलग 70 दिवस सूर्यच मावळत नाही

Viral News: असं ठिकाण जिथे 24 तास असतो दिवस; सलग 70 दिवस सूर्यच मावळत नाही

Sommarøy बेट

Sommarøy बेट

या ठिकाणी मे ते जुलै असे एकूण 70 दिवस सूर्य अजिबात मावळत नाही. मग पुढचे 3 महिने असे असतात, जेव्हा सूर्य अजिबात उगवत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 जून : तुम्ही कधी विचार केला आहे की जर सूर्य मावळला नाही आणि चंद्र उगवला नाही तर आपल्याला दिवस आणि रात्र कशी कळणार? आपण केव्हा आराम करायचा आणि केव्हा काम करायचं? रात्र आणि दिवस या संकल्पनेमुळेच आपलं जीवन सुव्यवस्थितपणे चालत आहे. अन्यथा ते फार कठीण झालं असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे काही महिने रात्र होतच नाही. नॉर्वेमध्ये असं एक बेट आहे, जिथे वर्षात काही महिने असे असतात ज्यामध्ये सूर्य मावळत नाही. विचार करा, जेव्हा सूर्य मावळत नाही, तेव्हा कोणी आपलं जीवनचक्र नीट कसं जगू शकेल? विचित्र गोष्ट अशी आहे, की निसर्गाचे हे अनोखे दृश्य आर्क्टिक सर्कलमध्ये असलेल्या Sommarøy बेटावर दिसते. या ठिकाणी मे ते जुलै असे एकूण 70 दिवस सूर्य अजिबात मावळत नाही. मग पुढचे 3 महिने असे असतात, जेव्हा सूर्य अजिबात उगवत नाही. म्हणजे 70 दिवस 24 तास प्रकाश आणि 3 महिने 24 तास अंधार असतो. या विचित्र दिवस-रात्र चक्राचा सामना येथे राहणाऱ्या 300 नागरिकांना करावा लागत असून त्यांच्यासाठी हे विचित्र आहे. अशा परिस्थितीत आपला परिसर जगातील प्रथमच टाइम फ्री झोन म्हणून घोषित करावा, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

डेली स्टारच्या वृत्तानुसार, येथील रहिवासी टाईम-फ्री झोन घोषित ​​होण्यासाठी मोहीम राबवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 70 दिवसांत त्यांच्यासाठी वेळ काय झाली आहे, याचा काही फरक पडत नाही. रात्री 2 वाजताही ते घर रंगवू शकतात, पहाटे 4 वाजताही पोहू शकतात. येथील लोक आपल्या व्यवसायासाठी आणि कामासाठी घड्याळाची मदत घेत नाहीत. घड्याळाचा वापर हॉटेल्स आणि लॉज सारख्या व्यवसायासाठी होत असला तरी, अनेक लोक म्हणतात की त्यांना त्यांचं जीवन मुक्तपणे जगायचं आहे. अशा परिस्थितीत त्यांना घड्याळाच्या बंधनाची गरज नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात