• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आली लहर, केला कहर! सकाळच्या लेक्चरला यायची झोप, वर्गातच पसरलं अंथरूण

आली लहर, केला कहर! सकाळच्या लेक्चरला यायची झोप, वर्गातच पसरलं अंथरूण

सकाळच्या लेक्चरला सतत झोप (Student takes mattress in the classroom and sleeps during lecture) येते म्हणून अंथरुण आणि पांघरूण घेऊनच एक तरुणी लेक्चर हॉलमध्ये गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

 • Share this:
  सकाळच्या लेक्चरला सतत झोप (Student takes mattress in the classroom and sleeps during lecture) येते म्हणून अंथरुण आणि पांघरूण घेऊनच एक तरुणी लेक्चर हॉलमध्ये गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सकाळच्या पहिल्या लेक्चरला (Sleep during first lecture) अनेकांना झोप येते. विशेषतः रात्री उशिरा झोपलेल्यांना पहाटे लवकर उठून कॉलेजला जाणं जीवावर येतं. उठण्याचे कष्ट घेऊन कॉलेजला गेलं तरी लेक्चर सुरु झाल्यानंतर हमखास पेंग येऊ लागते आणि डोळे मिटू लागतात. अशा प्रसंगात जर खऱोखरच वर्गात अंथरूण घालून आणि पांघरूण ओढून घेत झोपता आलं तर किती मजा येईल, हा विचारही विद्यार्थ्यांना सुखावणारा असतो. एका तरुणीनं हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणला आहे आणि त्याचा (Sleeping video in the classroom) व्हिडिओ टिकटॉकवरून शेअर केला आहे. लेक्चरला येत होती झोप आपल्याला सकाळी 9 वाजतच्या लेक्चरमध्ये गाढ झोप येत असल्याचा दावा तरुणीने टिकटॉक व्हिडिओमध्ये केला आहे. लेक्चरला झोप येणं हे चांगलं लक्षण असून आपण या गोष्टीचा आनंद लुटावा, असा विचार तिच्या मनात आला. त्यानंतर तिने क्लासरुममध्येच अंथरूण आणि पांघरूण घेऊन जाण्याचा निर्णय़ घेतला. ट्रॉलीवरून नेलं अंथरूण सकाळी नऊचं लेक्चर सुरू होण्यापूर्वीच या तरुणीने आपलं अंथरूण आणि पांघरूण एका ट्रॉलीवरून वर्गात नेलं. तिथं चक्क तिनं गादी पसरली आणि त्याच्यावर उशी आणि पांघरूणही ठेवलं. लेक्चर सुरू होताच तिने मस्तपैकी पांघरूण अंगावर ओढून घेतलं आणि लेक्चरचा आस्वाद घेत ती पडून राहिली. तिच्या या डेअरिंग कल्पनेचं अनेकांना कौतुक वाटलं. हे वाचा- NMRL DRDO Recruitment: नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे इथे भरती मैत्रिणीने केलं शूटिंग तरुणीच्या मैत्रीणीने या घटनेचं शूटिंग करून तो व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला. लेक्चरला बसून डुलक्या काढण्यापेक्षा नीट गादीवर झोपण्याचा आनंद अधिक निखळ असल्याचा अनुभ या तरुणीने व्यक्त केला आहे.
  Published by:desk news
  First published: