मराठी बातम्या /बातम्या /Viral /विद्यार्थिनीने फोन आपटत शिक्षिकेलाच मारली चापट; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर

विद्यार्थिनीने फोन आपटत शिक्षिकेलाच मारली चापट; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका विद्यार्थीनीनं आपल्याच शिक्षिकेला चापट लगावली (Student Slapped Female Teacher)

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका विद्यार्थीनीनं आपल्याच शिक्षिकेला चापट लगावली (Student Slapped Female Teacher)

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका विद्यार्थीनीनं आपल्याच शिक्षिकेला चापट लगावली (Student Slapped Female Teacher)

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार काही प्रमाणात कमी झालेला असल्याने जगभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू (School Reopen) झाल्या आहेत. मुलंही आता शाळेत जाऊ लागली आहेत. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहेत ज्यांच्याबद्दल ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एक असंच अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका विद्यार्थीनीनं आपल्याच शिक्षिकेला चापट लगावली (Student Slapped Female Teacher). या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनानेही कारवाई केली आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, टेक्सासमध्ये एका विद्यार्थीनीने आपल्या शिक्षिकेवरच राग काढला. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की रागात ही विद्यार्थीनी आपल्या जागेवरुन उठते आणि आपल्या आईला फोन करून शिक्षिकेच्या डेस्कजवळ जाते. जेव्हा शिक्षिकेनं असं करण्यास तिला मनाई केली तेव्हा तिने शिक्षिकेच्या हातावर चापट मारली. शिक्षिकेनं तिला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं मात्र तिनं काहीही ऐकलं नाही.

या विद्यार्थीनीने आपल्या आईला फोन लावला आणि शिक्षिकेबद्दल अपशब्दही बोलली. इतकंच नाही तर शेवटी या विद्यार्थीनीने रागात शिक्षिकेलाच मोबाईल फेकून मारला आणि यानंतर वर्गातून बाहेर गेली. यादरम्यान शिक्षिका अतिशय शांत उभा होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ क्लासमधीलच विद्यार्थीनीने रेकॉर्ड केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

शाळेच्या प्रशासनाने म्हटलं की शिक्षिकेच्या शांत स्वभावाचं आम्ही कौतुक करतो. संपूर्ण घटनेत शिक्षिका आणि तिच्या प्रतिक्रियेचं आम्ही समर्थन करतो. शिक्षिकेविरोधात अपशब्द, छळ आणि हिंसेचं आम्ही समर्थन करणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media