जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिव मंदिरात सिंहांची दहशत; अडकलेल्या पुजाऱ्याने असा वाचवला जीव, पाहा Video

शिव मंदिरात सिंहांची दहशत; अडकलेल्या पुजाऱ्याने असा वाचवला जीव, पाहा Video

शिव मंदिरात सिंहांची दहशत

शिव मंदिरात सिंहांची दहशत

अनेक ठिकाणी वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत दहशत माजवताना दिसतात. दिवसेंदिवस प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भितीचं वातावरण आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जुलै: अनेक ठिकाणी वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत दहशत माजवताना दिसतात. दिवसेंदिवस प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भितीचं वातावरण आहे. आत्तापर्यंत वन्य प्राणी घरात शिरुन माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ला करतानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये सिंहांची दहशत पहायला मिळाली. यावेळी सिंह थेट शिव मंदिरात शिरलेले दिसले. याचा व्हिडीओही समोर आला आहे. शिव मंदिरात सिंहाचा कळप आल्याची घटना गुजरातमधीम समोर आली आहे. गुजरातच्या गीर जंगलात सिंहांची संख्या चांगली आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. काहीवेळा परिसरातील वन्य प्राणी आजूबाजूच्या गावात तर कधी रस्त्यांवरही दिसतात.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या समोर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिव मंदिरात काही सिंह, सिंहिण घुसले. त्यावेळी मंदिरात पुजारीही उपस्थित होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुजाऱ्याने मंदिराच्या दरवाजांना कुलुपही लावले. जेणेकरुन हे भयानक प्राणी आत येऊ नये. प्राण्यांनी तेथून पळ काढावा म्हणून पुजाऱ्याने वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली. यावेळी त्यानं कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैदही केलं. पुजाऱ्याची ही युक्ती कामी आली आणि हा प्राण्यांचा कळप परत गेला. @abhaysinh_g नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत युजरने लिहिलं की, सिंहीण तिच्या 2 शावकांसह मंदिरात पोहोचली होती. तिघेही बराच वेळ मंदिराच्या आवारात फिरत राहिले. सिंह येत असल्याचं पाहून पुजाऱ्याने सर्व दरवाजे आधीच बंद केले होते, जेणेकरून ते आत येऊ नयेत. यानंतर इकडे तिकडे फिरत असताना एक शावक ग्रीलच्या अगदी जवळ आले. मग, समजूतदारपणा दाखवत, शावकाचे लक्ष विचलित व्हावे आणि तो परत जावा म्हणून पुजाऱ्याने वेगवेगळे आवाज काढले.

जाहिरात

दरम्यान, गीर आणि आसपासच्या भागात या धोकादायक प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. धोकादायक प्राण्यांच्या वावरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात