• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हा नाचतोय की व्यायाम करतोय? VIDEO करेल हसून हसून पुरेवाट

हा नाचतोय की व्यायाम करतोय? VIDEO करेल हसून हसून पुरेवाट

लग्नात एका तरुणाने असा काही डान्स केला (Strange dance of a youth goes viral in social media) की त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नसल्याचं दिसत आहे.

 • Share this:
  लग्नात एका तरुणाने असा काही डान्स केला (Strange dance of a youth goes viral in social media) की त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नसल्याचं दिसत आहे. सध्या लग्नसराईचा (Season of marriage) काळ सुरू आहे. गेली दोन वर्षं कोरोनामुळे अनेक लग्नसमारंभ साध्या पद्धतीनं पार पडले किंवा अनेकांनी हा सोहळा पुढं ढकलला. आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्यामुळे पुन्हा एकदा लग्न समारंभात गर्दी व्हायला (Crowd in marriages) सुरुवात झाली आहे. अशाच एका लग्नात डान्स करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ एकाने रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटिझन्स खदखदून हसताना दिसत आहेत. डान्स की व्यायाम? व्हिडिओत दिसणारा तरूण अशा प्रकारे डान्स करतो आहे की जणू तो जिममध्ये व्यायाम करत आहे, असं वाटावं. बायसेप आणि ट्रायसेपचा जिममध्ये व्ययाम करताना जशी ऍक्शन केली जाते, तशीच ऍक्शन तो डान्स करताना करत आहे. त्यामुळे तरुणाला डान्स येतच नसल्यामुळे तो असला प्रकार करतो आहे की त्याला आपण जिममध्ये जाऊन पिळदार शरीरयष्टी बनवली आहे, हे इतरांना दाखवायचं आहे, असा प्रश्न अनेक युजर्सनी उपस्थित केला आहे. हे वाचा - 'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील' व्हिडिओ होतोय व्हायरल या व्हिडिओवर काहीजण टीका करत आहेत, तर अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. काहीजणांना हा तरुण अभिनेता सलमान खानची कॉपी करत असल्याचं वाटतं. तर अनेकांनी त्याच्या व्यायामावरून टीका केली आहे. सकाळी कदाचित हा तरुण व्यायाम करायचं विसरून गेला असावा, त्यामुळे या ठिकाणी तो व्यायामाची फॉरमॅलिटी संपवून घेत असेल, असंही मत काहीजणांनी व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
  Published by:desk news
  First published: