मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं 'मृत बाळ'; आईच्या गर्भातच झाला होता मृत्यू

Shocking! अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं 'मृत बाळ'; आईच्या गर्भातच झाला होता मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Dead Baby Gets Alive During Burial : रुग्णालयाने आईच्या पोटातच बाळ मृत झाल्याचं सांगितलं पण जेव्हा त्याला अंत्यसंस्कारासाठी नेलं तेव्हा ते अचानक रडू लागलं.

श्रीनगर, 25 मे : अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की जगात चमत्कार नावाची काही गोष्ट नसते. लोक याला अंधश्रद्धा समजतात, तर काही लोग त्याला योगायोग असं नाव देतात. आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणा योगायोग म्हणा की आणखी काही. रुग्णालयाने ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं म्हटलं ते बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत झालं. दफन करताना ते अचानक रडू लागलं (Dead Baby Gets Alive During Burial).

जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधील ही घटना आहे.  बनिहाल उपआरोग्य केंद्रात शमीमा बेगम नावाची महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. सोमवारी तिने एका मुलीला जन्म दिला. पण बाळाची तपासणी केल्यानंतर रुग्णालयाच्या स्टाफने तिला मृत घोषित केलं. बाळाच्या आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केला.  बाळाच्या आगमनाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. बाळ मृत म्हटल्यावर सर्वांनी आशाच सोडली होती. बाळाच्या स्वागताऐवजी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ ओढावली.

हे वाचा - संतापजनक! डॉक्टरसमोर रुग्णाच्या डोळ्यातून आलं पाणी; क्लिनिकने रडण्याचेही पैसे वसूल केले

बाळाला घेऊन त्याचं कुटुंब होलन गावातील दफनभूमीत पोहोचलं. बाळाला दफन करण्यासाठी कबर बनवली जात होती. बाळाला दफन करणार तोच बाळ अचानक मोठमोठ्याने रडू लागलं. तिथं उपस्थित सर्वांना शॉक बसला. कारण ज्या बाळाला मृत घोषित करण्यात आलं ते जिवंत होतं. बाळ जर रडलं नसतं तर कदाचित त्याच्या पालकांनी त्याला कधीच जिवंत पाहिलं नसतं.

आता याला चमत्कार म्हणावा की वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा, ज्यांनी बाळाला मृत घोषित केलं आणि ते बाळ दफन करतानाच रडू लागलं. यानंतर दफनभूमीतच रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आलं.

गेल्या वर्षी झारखंडमध्येही घडला होता असाच प्रकार

गेल्या वर्षी रांचीच्या देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं होतं. मधुपूर पिपरासोल निवासी असलेली नवजात बाळाचा आजी रेखा देवी यांनी सांगितलं, की क्लिनिकमध्ये तिच्या सुनेची प्रसूती केली गेली. जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ जिवंत नसून त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी पुढे सांगितलं, की डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच नवजात बाळ अचानक रडू लागलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

हे वाचा - माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात अडकला तांब्या, 3 दिवस आईची बाळासाठी घालमेल

यानंतर वैतागलेल्या नातेवाईकांनी क्लिनिकची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं.

First published:
top videos

    Tags: Baby died, Lifestyle, Small baby, Viral