वॉशिंग्टन, 19 मे : लहानपणी बहुतेकांना इंजेक्शन (Injection), औषधं घेताना रडूच कोसळतं. लहान मुलंच नाही तर काही प्रौढ व्यक्तींनासुद्धा याची भीती वाटते. काहींना तर डॉक्टरकडे गेल्यावर किंवा टेस्ट करतानाही रडू येतं. तर काही जण आजारपणाला वैतागले असातत किंवा आजारामुळे आपल्यााल काय होईल या भीतीने इमोशनल झालेले असतात. अशावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. पण एका क्लिनिकने अशाच रडणाऱ्या रुग्णाच्या अश्रूंचीही किंमत लावली आहे. रुग्ण रडल्याने त्याच्याकडून रडण्याचेही पैसे वसूल करण्यात आले आहेत (Patient Charged for crying).
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणारी युट्यूबर केमिली जॉनसनने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने आपल्या बहिणीच्या उपचाराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिची छोटी बहीण एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी ती एका डॉक्टरांकडे गेली. जिथं तिच्या रडण्याचेही पैसे वसूल करण्यात आले.
हे वाचा - VIDEO - Boxing करताना रिंगमध्येच आला Heart attack; कधीच पराभव न झालेला तरुण Boxer Musa Yamak ला मृत्यूने हरवलं
यूट्युबरने पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, माझी बहीण इमोशनल झाली कारण ती फ्रस्ट्रेटेड झाली होती. तिला हेल्पलेस वाटत होतं. तिच्या डोळ्यांतून एक अश्रूचा थेंब पडला आण डॉक्टरंनी त्याचे जवळपास 3 हजार रुपये वसूल केले आहे. ती का रडते आहे, हेसुद्धा त्यांनी विचारलं नाही. मदत करणं, त्यामागील कारण समजून घेणं, प्रिस्क्रिप्शन असं काहीच नाही.
क्लिनिकमध्ये माझ्या बहिणीचे तपासणीचे कमी आणि रडण्याचे जास्त पैसे वसून करण्यात आले. हेल्थ रिक्त असेसटमेंट, कॅपिलरी ब्लड ड्रॉह याचेही कमी पैसे घेण्यात आले, असं ती पुढे म्हणाली.
हे वाचा - थायरॉईड असल्यास शरीरात होतात 'हे' बदल, चुकूनही करु नका दुर्लक्ष
तिने हॉस्पिटलचं बिलही पोस्ट केलं आहे. ज्यात इमोशनल आणि बिहेव्हिरिअल असेसमेंटसाठी चार्ज केल्याचं दिसतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.