मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइड घेणं पडलं महागात, अशी अवस्था की स्वत:ला ओळखनं झालं कठीण

बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइड घेणं पडलं महागात, अशी अवस्था की स्वत:ला ओळखनं झालं कठीण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

स्टेरॉइड्समुळे शरीरातले स्नायू प्रसरण पावतात. शरीर खूपच पीळदार दिसतं. परंतु, स्टेरॉइड्सच्या सेवनाने शरीराचे नुकसान देखील होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 28 नोव्हेंबर : अनेकांना असं वाटत असतं, की आपलं शरीर सुदृढ असावं. यासाठी अनेक जण नियमितपणे जिममध्ये जातात. सुदृढ आणि कमावलेल्या शरीराबद्दल तरुणाईत नेहमीच क्रेझ दिसून येते. त्यासाठी मग काही जण जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवतात. प्रोटीन शेक आणि तत्सम पेयं घेतात. परंतु, अशा प्रकारे प्रोटीन शेकचं अतिसेवन किंवा स्टेरॉइड घेणं हानिकारक ठरू शकतं. शरीर पीळदार दिसावं यासाठी स्टेरॉइड्स घेतल्याचे गंभीर परिणाम कसे होतात, याचा स्वतः घेतलेला अनुभव एका बॉडीबिल्डरने नुकताच शेअर केला आहे.

स्टेरॉइड्समुळे शरीरातले स्नायू प्रसरण पावतात. शरीर खूपच पीळदार दिसतं. परंतु, स्टेरॉइड्सच्या सेवनामुळे त्या बॉडीबिल्डरच्या पाठीवर फोड आले. त्याला रुग्णालयात जावं लागलं. ही समस्या इतकी गंभीर झाली होती, की त्याला झोपणंही अवघड झालं.

या बॉडीबिल्डरने व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आणि स्टेरॉइड्स घेणं कसं चुकीचं आहे, याबद्दलचे अनुभवाचे बोल सांगितले.

डेव हार्ट्रे असं या बॉडीबिल्डरचं नाव असून, तो आयर्लंडमधल्या वॉटरफोर्डचा रहिवासी आहे. 24 वर्षाच्या डेवने शेअर केलेल्या व्हिडिओत असं म्हटलंय, की त्याने वयाच्या 20व्या वर्षी स्टेरॉइड घ्यायला सुरुवात केली. यानंतर हळूहळू त्याच्या शरीरावर फोड यायला सुरुवात झाली आणि मग काळे डाग, पिंपल्स यायला सुरुवात झाली.

आधीचा फोटो

डेव म्हणाला, 'मी फिटनेस फ्रिक आहे, तसंच वयाच्या 15व्या वर्षापासून व्यायाम करतोय. काही वर्षांपूर्वी मी एका ट्रेनरच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलं आणि यात मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यानंतर मी प्रोफेशनल बॉडीबिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शरीर कमावण्यासाठी निश्चितच खूप वेळ लागतो. यामुळेच मी स्टेरॉइड घेण्याचा निर्णय घेतला.

स्टेरॉइड घेतल्यानंतर शरीरातल्या टेस्टोस्टेरॉनमध्ये खूप वाढ झाली. त्यामुळे माझ्या तब्येतीवर खूप परिणाम झाला. संपूर्ण शरीरात दाह व्हायला लागला. टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिक पातळी मर्यादित असते, परंतु स्टेरॉइड घेतल्याने ती खूप वाढली. त्यामुळे शरीरातली उष्णता खूप वाढली. स्टेरॉइड कोणीही न घेण्याचा सल्ला मी देईन. कारण त्यामुळे शरीरावर फार गंभीर परिणाम होतात.'

डेव म्हणाला, '2020मध्ये पहिल्यांदा माझ्या पाठीवर, तोंडात फोड आले. मी ट्रेनरच्या सल्ल्यानेच स्टेरॉइड घ्यायला सुरुवात केली होती. यानंतर मी रोजच्या रोज स्वत:ला दोष देत होतो. कारण हे सगळंच माझ्यासाठी खूपच वेदनादायी होतं. माझ्या शरीरावर आलेल्या फोडांचा मला खूप त्रास होत होता. शेवटी मी स्टेरॉइड घेणं बंद केलं होतं.

सध्याचा फोटो

एक दिवस माझ्या पाठीवर आलेले फोड फुटले आणि सगळीकडे जखमा दिसू लागल्या. झोपताही येत नव्हतं. या सगळ्यातून बाहेर पडायला मला नऊ महिने लागले. परंतु, अजूनही माझ्या पाठीवर आणि हातांवर फोडांच्या खुणा आहेत. मी आजही डॉक्टरांकडे जातो; जेणेकरून माझ्या शरीरावरच्या फोडाच्या खुणा नाहीशा होतील.

यासाठी मला प्रत्येक सेशनसाठी 20 हजार रुपयांहून अधिक खर्च येतो. आणखी किती पैसे खर्च करावे लागतील, याचा अंदाज नाही. शरीराला खाज सुटण्याचं प्रमाण अद्याप कायम आहे.'

डेवचं हे उदाहरण नक्कीच डोळं उघडणारं आहे. शरीर पीळदार दिसायला हवं असेल, तर योग्य तो आहार आणि उत्तम मार्गदर्शकांकडून सल्ला घेणं उपयुक्त ठरेल.

First published:

Tags: PHOTOS VIRAL, Shocking news, Social media and relationships, Viral, Viral news