मराठी बातम्या /बातम्या /Viral /सावत्र बापाचं राक्षसी कृत्य; मुलीच्या मित्राला भररस्त्यात बेल्टने मारहाण, धक्कादायक VIDEO

सावत्र बापाचं राक्षसी कृत्य; मुलीच्या मित्राला भररस्त्यात बेल्टने मारहाण, धक्कादायक VIDEO

मुलाला मारहाण सुरू असताना काहींना हा प्रकार मोबाइलमध्ये शूट केला.

मुलाला मारहाण सुरू असताना काहींना हा प्रकार मोबाइलमध्ये शूट केला.

मुलाला मारहाण सुरू असताना काहींना हा प्रकार मोबाइलमध्ये शूट केला.

भोपाळ, 14 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh News) एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील हरदा भागातील आहे. प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयाने एक तरुणी आणि तरुणाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करीत असल्याचा हा व्हिडीओ आहे. (Shocking viral video)

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणीला मारहाण करीत असणारी व्यक्ती मुलीचा सावत्र बाप आहे. भररस्त्यात तो मुलीला बेल्टने मारहाण करीत होता. येथील काहींनी हे दृश्य मोबाइलमध्ये शूट केले. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Stepdaughter beats daughters friend with belt shocking VIDEO)

हे ही वाचा-चवताळलेल्या हत्तीने सोंडेने हवेत उडवली कार; पाहा गजराजाच्या रूद्र अवताराचा VIDEO

या व्हिडीओमध्ये तरुणी त्यांना सोबत असलेला तरुण मित्र असल्याचं सांगत होता. मात्र सावत्र बाप मुलीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. ही घटना डंगावायानीमा रोडवरील आहे. या प्रकरणात तरुण आणि तरुणीने वडील रामसेवक आणि त्यांचा भाऊ रामजीवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

" isDesktop="true" id="618196" >

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोघांनाही भररस्त्यात बेल्टने मारहाण केली जात आहे. आणि तरुणी यात आपली चूक नसल्याचं ओरडून ओरडून सांगत आहे.

 

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Shocking viral video