मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फक्त तीन मिनिटांचा उशीर आणि नोकरी गेली; उशीर झाल्यामुळे 'या' कंपनीनं महिला कर्मचाऱ्याला टाकलं काढून

फक्त तीन मिनिटांचा उशीर आणि नोकरी गेली; उशीर झाल्यामुळे 'या' कंपनीनं महिला कर्मचाऱ्याला टाकलं काढून

 स्टारबक्सनं एक महिला कर्मचाऱ्याला कामावर येण्यास तीन मिनिटं उशीर झाल्यानं नोकरीतून काढून (Employee Fired For Coming Late 3 Minutes) टाकलं आहे.

स्टारबक्सनं एक महिला कर्मचाऱ्याला कामावर येण्यास तीन मिनिटं उशीर झाल्यानं नोकरीतून काढून (Employee Fired For Coming Late 3 Minutes) टाकलं आहे.

स्टारबक्सनं एक महिला कर्मचाऱ्याला कामावर येण्यास तीन मिनिटं उशीर झाल्यानं नोकरीतून काढून (Employee Fired For Coming Late 3 Minutes) टाकलं आहे.

नवी दिल्ली, 18 ऑग्सट : अमेरिकेतल्या स्टारबक्स कंपनीची व्याप्ती जगभरात आहे. अनेक लाख कर्मचारी स्टारबक्समध्ये नोकरी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये स्टारबक्समध्ये (Starbucks) कामगार संघटना असावी असा मतप्रवाह तयार झाला आहे. त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातच आता स्टारबक्सनं एक महिला कर्मचाऱ्याला कामावर येण्यास तीन मिनिटं उशीर झाल्यानं नोकरीतून काढून (Employee Fired For Coming Late 3 Minutes) टाकलं आहे. कामगार संघटनेची स्थापना आणि या महिला कर्मचाऱ्याच्या निलंबनाबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. स्टारबक्सचा समावेश जगातल्या सर्वांत मोठ्या कॉफी रिटेलर्स (Coffee Retailers) कंपन्यांमध्ये होतो. वॉशिंग्टन-सिअ‍ॅटलमध्ये स्टारबक्स सेंटर नावाचं कंपनीचं मुख्यालय आहे. 2021च्या आकडेवारीनुसार, कंपनीत 3.83 लाख कर्मचारी होते, तर 31.39 बिलियन डॉलर्स इतकी स्टारबक्सची संपत्ती होती. अमेरिकेतल्या या बड्या कंपनीमध्ये सध्या कर्मचारी नाराज आहेत. गेल्या काही दिवसांत कामगार संघटना असावी या कामगारांच्या मागणीला कंपनीनं विरोध केल्यामुळे स्टारबक्सबद्दल मोठी चर्चा सुरू होती. अमेरिकेतल्या स्टारबक्सच्या 200 पेक्षा अधिक स्टोअर्समधल्या कर्मचाऱ्यांनी कामगार संघटना सुरू करण्याच्या बाजूनं मत दिलं होतं. त्यात आता कंपनीनं एका महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार जोसेलिन चुकिलांकी असं त्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. गेल्या सात वर्षांपासून ती या कंपनीत काम करत होती; मात्र कामावर तीन मिनिटं उशिरा आल्यामुळे तिला काढून टाकण्यात आलं. हेही वाचा -  ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नाहीत म्हणून भडकली नवरीबाई; रागात उचललं धक्कादायक पाऊल जोसेलिन चुकिलांकी 28 वर्षांची असून तिला स्टारबक्समधली नोकरी आवडत होती. या नोकरीमुळे तिला तिच्या भाचीसाठी वेळ देणं शक्य होतं; मात्र कोरोना महामारीच्या काळात कंपनीच्या सीक लिव्ह पॉलिसीमुळे तिला काही अडचण आली होती. त्या वेळी तिनं इतर कर्मचाऱ्यांना कामगार संघटना तयार करण्याविषयी एकत्र केलं होतं. याचाच परिणाम म्हणून स्टारबक्सनं जोसेलिन हिला कामावरून काढून टाकलं असावं, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कामगार संघटना तयार करण्याच्या तिच्या प्रयत्नांनंतर (Conflict Over Labour Union) वरिष्ठांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केल्याचं तिनं बीबीसीला सांगितलं. ज्या चुकांसाठी इतर कर्मचाऱ्यांना माफी दिली जात होती, त्यासाठी तिला मात्र शिक्षा दिली जायची. एकदा ती दुकानाची किल्ली कुठे तरी विसरली. त्याबाबत तिनं लगेचच मॅनेजरला फोन करून सांगितलं. त्यानंतर ती किल्ली दुकानातच सापडली; मात्र जोसेलिनवर कामातल्या दिरंगाईबाबत कारवाई करण्यात आली. आता तीन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे तिला कामावरून कमी केलंय. टाटा समूहाबरोबर (TATA) स्टारबक्सने भारतात प्रवेश केला. भारतात दोन्ही समूहांची 50-50 टक्के भागीदारी आहे. मुंबईत 2012 मध्ये हॉर्निमन सर्कल इथं स्टारबक्सचं पहिलं कॉफी शॉप उघडलं गेलं. त्यानंतर कंपनीचा इतक्या वेगानं प्रसार झाला की 2018 मध्ये स्टारबक्सनं भारतात 100वं दुकान सुरू केलं. सध्या स्टारबक्सची भारतात 200 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. तिथं 2 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. स्टारबक्सने महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्यामुळे आता कंपनीच्या धोरणांविषयी कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर कंपनी काय स्पष्टीकरण देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
First published:

Tags: Social media, Viral news

पुढील बातम्या