मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नाहीत म्हणून भडकली नवरीबाई; रागात उचललं धक्कादायक पाऊल

ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नाहीत म्हणून भडकली नवरीबाई; रागात उचललं धक्कादायक पाऊल

ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला न आल्याने नवरीला आला राग. (प्रतीकात्मक फोटो)

ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला न आल्याने नवरीला आला राग. (प्रतीकात्मक फोटो)

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एकूण 70 सहकाऱ्यांना महिलेने आपल्या लग्नाचं आमंत्रण दिलं पण त्यापैकी फक्त एकच जण आला याचं तिला वाईट वाटलं.

    बीजिंग, 17 ऑगस्ट : आपल्या लग्नाच्या आनंदात सर्वांनी सहभागी व्हावं म्हणून आपण सर्वांना लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण देतो. काही मोजके लोक असे असतात ज्यांनी आपल्या लग्नाला यावंच असं आपल्याला वाटतं आणि लग्नात आपण त्यांची वाट पाहत असतो. ते न आल्याचं वाईट वाटतंच. त्यानंतर तुम्ही फार फार तर काय कराल, त्यांच्यावर रागवाल, त्यांना ओरडाल, त्यांच्याशी काही दिवस अबोला धराल. पण एक नवरी तर याच्याही पलीकडे गेली. तिनं असं काही केलं ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार करणार नाही. लग्नात आपण कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही बोलावतो. चीनमधील एका नवरीबाईनेही आपल्या लग्नाला ऑफिसमधील आपल्या मित्रमैत्रिणींना बोलावलं. ऑफिसमध्ये तिच्यासोबत काम करणाऱ्या एकूण 70 सहकाऱ्यांना तिने लग्नाचं आमंत्रण दिलं. पण त्यापैकी फक्त एकच फ्रेंड तिच्या लग्नाला आला. ते पाहून तिला खूप वाईट वाटलं, राग आला. याच रागाच्या भरात तिने धक्कादायक पाऊल उचललं. तिने जे केलं ते फक्त वाचूनच तुम्ही हैराण व्हाल. हे वाचा - 9 बायका फजिती ऐका! मजेमजेत एकाच वेळी केलं 9 जणींशी लग्न; आता झाला भलताच वांदा नवरीच्या मते, दोन महिन्यांपूर्वी तिने सर्वांना आपल्या लग्नाचं आमंत्रणं दिलं. पण कुणीच न आल्याने ती दुःखी होती. जी व्यक्ती तिच्या लग्नाला आली ती तिच्या अंडर काम शिकत होती. ऑफिसमधील कर्मचारी मित्र नाहीत फक्त मित्र असण्याचा दिखावा करतात. ऑफिसमधील सहकारी न आल्याने सहा टेबलांवर सर्व्ह केलेलं अन्न फेकावं लागलं. पाहुण्यांसमोरही मान झुकली.  यानंतर तिने लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नोकरी सोडली. तिने राजीनामा दिला. हे वाचा - सोशल मीडियावर Quiet Quitting ट्रेंडची चर्चा, ‘या’ कारणांमुळे नोकरी सोडतायत कर्मचारी नोकरी सोडणं हा आपल्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. ऑफिसमध्ये त्रास होत असेल, बॉस छळत असेल, कामाचा ताण जास्त असेल, सहकाऱ्यांसोबत पटत नसेल, पगार नीट मिळत नसेल अशा काही कारणांमुळे आपण नोकरी सोडतो. पण लग्नात सहकारी न आल्याने नोकरी सोडणं हे आश्चर्यकारकच आहे. तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Viral, Viral news, Viral post

    पुढील बातम्या