बीजिंग, 27 एप्रिल : कानाने आपण ऐकतो पण बऱ्याचदा आपल्याला आपल्या काना च्या आतून आवाज येत असल्यासारखं वाटतं. असंच एका महिलेच्या बाबतीतही झालं. तिच्या कानातूनहून विचित्र आवाज येत होता. बऱ्याच दिवसांपासून तिला ही समस्या होती. पण अचानक एक दिवस तिच्या कानात तीव्र वेदना सुरू झाल्या. तेव्हा तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिच्या कानात पाहिलं असता त्यांनाही मोठा धक्का बसला. चीनच्या सिचुआनमधील ही धक्कादायक घटना आहे. इथं राहणारी 40 वर्षांची महिला. जिच्या कानातून विचित्र आवाज येत होता. ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांना वाटलं की तिला टिनिटस हा आजार असावा. पण नंतर हान शिंगलाँगमधील कानाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्या कानात पाहिलं. त्यांना आत जे दिसलं ते पाहून त्यांच्याही अंगावर काटा आला.
तिच्या कानातील विचित्र आवाज, वेदना यामागे कोणता आजार नाही तर वेगळंच कारण होतं. त्या महिलेच्या कानात चक्क कोळी होता. या कोळ्याने तिच्या कानात आपलं घर बनवलं होतं, जाळं विणलं होतं. VIDEO - तिला ऐकू येत होता विचित्र आवाज आणि तीव्र खाज; कानात पाहताच डॉक्टरही शॉक महिलेच्या कानात कोळ्याचं मोठं जाळं दिसत होतं. डॉक्टरांना हे सुरुवातीला इअरड्रम वाटलं. पण नीट पाहिलं तेव्हा त्यात काहीतरी चालताना दिसलं. त्यांनी ते जाळं बाजूला केलं तेव्हा तिथून एक कोळी निघाला, जो तिच्या कानात पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण कसंबसं डॉक्टरांनी कोळ्याला धरलं आणि महिलेच्या कानातून बाहेर काढलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या मते, कोळी आता पिल्लं काढण्याच्या तयारीत होता. सुदैवाने त्या आधीच महिलेच्या कानात वेदना सुरू झाल्या. कोळ्याच्या जाळ्यामुळे तिच्या इअर कॅनलला हानी पोहोचली आहे. पण कोणतं इन्फेक्शन झालेलं नाही. 11 वर्षांपासून दुखत होतं महिलेच्या पोटात, MRI करताच समोर आलं धक्कादायक सत्य कानात कोळी सापडण्याची चीनमधील ही पहिली घटना नाही. याआधीसुद्धा सिचुआनमध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळ्याने जाळं विणलं होतं. कान दुखत असल्यानं आणि खाज येत असल्याची तक्रार घेऊन ही महिला डॉक्टरांकडे आली. कानातून आवाज येत असल्याचंही या महिलेनं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी त्या महिलेच्या कानात तपासणी केली. कानात एक जिवंत कोळी असल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी केमिकलचे थेंब कानात काढून चिमट्यानं कोळ्याला बाहेर काढलं. याशिवाय हुनान प्रांतातील झुझोऊ शहरातील महिलाही कानातील खाजेने त्रस्त झाली होती. तिच्या कानात इतकी भयंकर खाज येऊ लागली ती कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेली. सुरुवातीला डॉक्टरांना तिच्या कानात इन्फेक्शन झालं असं वाटलं पण जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा ते शॉक झाले. तिच्या कानात कॅमेरा टाकून जेव्हा पाहण्यात आलं तेव्हा कानात चक्क एक कोळी असल्याचं दिसलं. हा कोळी छोटासा नाही तर आठ पायांचा मोठा कोळी होता. त्याने तिच्या कानात जाळंही विणलं होतं डॉक्टरांनी तिच्या कानातील कोळी बाहेर काढला, त्यानंतर महिलेला आराम मिळाला.