बीजिंग, 20 जुलै : कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. श्रवणक्षमता चांगली राहण्यासाठी कानाचं आरोग्य जपणं आवश्यक आहे. कानात पाणी गेलं तरी आपण बेचैन होतो. दात दुखणं हे काही वेळा असह्य होतं, तसंच कानाचंदेखील आहे. कानाला इजा झाली किंवा कानात काही गेलं तर तीव्र वेदना होतात. चीनमधल्या एका व्यक्तीबाबत असाच एक विचित्र प्रसंग घडला. या व्यक्तीच्या कानात स्पायडर म्हणजेच कोळी गेला. विशेष म्हणजे, कानात गेल्यावरही तो जिवंत असल्याचं डॉक्टरांना आढळलं. या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कानात चुकून काही गेलं तर कमालीचं बेचैन व्हायला होतं. चीनमधल्या एका व्यक्तीवर असाच प्रसंग आला. त्याच्या कानात कोळी गेला. डॉक्टरांनी मायक्रोस्कोपने कानाची तपासणी केली, तेव्हा त्यांना त्याच्या कानात हा कोळी जिवंत असल्याचं दिसलं. हे दृश्य पाहून डॉक्टरांनाही क्षणभर धक्का बसला. सध्या याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रमावर डेली मेलने (@ Daily Mail) पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच काही तासांतच त्याला सहा हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले. तसंच या व्हिडिओवर अनेक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनादेखील भीती वाटल्याचं काही कमेंट्समधून दिसत आहे. डेंजरस इश्क! गर्लफ्रेंडच्या Love Bite ने घेतला बॉयफ्रेंडचा जीव; नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, `चीनमधल्या एका व्यक्तीला कानात अचानक वेदना जाणवू लागल्या. कान दुखत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला. कानात कोळी गेला असून त्याने आतमध्ये जाळं विणल्याचं तपासणी केल्यावर दिसून आलं.` ही व्यक्ती झोपली असताना त्याच्या कानात कोळी गेल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओवर अनेक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. `सर्वांत मोठी भीती. खरं तर अशा घटना सामान्य आहेत. अशा प्रकारच्या बहुतांश घटना उडणाऱ्या कोळ्यामुळे घडतात. कोणाला वाटलं की आपल्या कानात कोळी किंवा अन्य किडा गेला आहे तर अशा स्थितीत सर्वप्रथम शांत राहा. एका ठिकाणी बसून मान जितकी जाईल तितकी जमिनीच्या दिशेने न्या. कानात बोट घालून कान थोडा खाली खेचा आणि हळूहळू डोकं हलवा. यामुळे कानात गेलेला किडा बाहेर येऊ शकतो. असं करणं शक्य नसेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा,` असं एका युझरनं कमेंट करताना म्हटलं आहे. दुसरा एक युझर, `हे सगळं भीतिदायक आहे,` असं म्हणतो. तिसऱ्या एका युझरनं असं लिहिलं आहे, की `हे पाहिल्यावर झोप लागणं मुश्किल आहे.` OMG! अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने केली सिझेरियन डिलीव्हरी; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात, तर त्यात मायक्रोस्कोप व्ह्यूमध्ये या पुरुषाच्या कानातला जिवंत कोळी स्पष्ट दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.