मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलानं आईसाठी काढलं चित्र, संदेश वाचून बसला Shock; Photo होतोय Viral

मुलानं आईसाठी काढलं चित्र, संदेश वाचून बसला Shock; Photo होतोय Viral

आईनं मुलासाठी काढलेल्या चित्रावरचा (Spelling mistake in the painting of 4 year old shocks his mother) संदेश वाचून त्याच्या आईला जोरदार धक्काच बसला

    आईनं मुलासाठी काढलेल्या चित्रावरचा (Spelling mistake in the painting of 4 year old shocks his mother) संदेश वाचून त्याच्या आईला जोरदार धक्काच बसला. लहान मुलांसाठी त्यांचे आईवडील हेच हिरो असतात. आपली आई आणि वडील हे जगातील सर्वोत्तम (Best parents in the world) पालक आहेत, असं त्यांना वाटत असतं आणि आपल्या भावना ते वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त करत असतात. नुकतीच एका 4 वर्षांच्या मुलानं अशाच प्रकारे आपली भावना व्यक्त केली, मात्र हे करताना त्यानं जे काही लिहिलं, ते त्याच्या आईसाठी धक्कादायक होतं. काय लिहिला संदेश? क्लेअर लुई ही चार मुलांची आई. तिचा सर्वात छोटा मुलगा 4 वर्षांचा आहे. त्यानं आपल्या आईसाठी एक बॅटमॅनचं चित्र काढलं. आई हीच आपली सुपरहिरो असून आपल्यासाठी तीच बॅटमॅन आहे, असा संदेश या मुलाला द्यायचा होता. त्यानं चित्र उत्तम काढलं, त्यात चांगले रंगही भरले. मात्र शेवटी त्यावर मेसेज लिहिताना गडबड केली. त्याने आईला सुपरहिरो म्हणताना, हिरो या शब्दाचं स्पेलिंग चुकवलं. HERO असं लिहिण्याऐवजी HORE असं स्पेलिंग लिहिलं. हे वाचून आईला धक्का बसला आणि तिला प्रचंड हसू फुटलं. मुलाला काय म्हणायचं होतं, हे तिला बरोबर समजलं आणि स्पेलिंग मिस्टेकमुळे झालेली गंमत पाहून हसूही येऊ लागलं. होर या शब्दाचा अर्थ वयोवृद्ध स्त्री किंवा देहविक्रय करणारी स्त्री असा होतो. मात्र 4 वर्षांच्या मुलाला हा फरक माहित असण्याची शक्यताच नव्हती. हे वाचा -औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप आईनं शेअर केला फोटो हा फोटो क्लेअरनं तिच्या कुटुंबीयांच्या ग्रुपमध्ये शेअर केला आणि त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. अनेकांनी त्यांच्या बाबतीत झालेल्या अशाच गंमतीजमतीही शेअर केल्या.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Mother, Pictures, Small child

    पुढील बातम्या