सामान खरेदी करताना अचानक सुपरमार्केटमधील शेल्फ कोसळले आणि...पाहा थरारक VIDEO

सामान खरेदी करताना अचानक सुपरमार्केटमधील शेल्फ कोसळले आणि...पाहा थरारक VIDEO

या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू 3 जणांची प्रकृती गंभीर तर 3 जण जखमी आहेत.

  • Share this:

रिओ, 05 ऑक्टोबर : बऱ्याचदा आपण सामान एकत्र खरेदी करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये जातो. अशावेळी नुसतं आपल्या हातून एखादी गोष्ट शेल्फमधून खाली कोसळली तरीही आरडाओरडा होतो मात्र एका सुपर मार्केटमध्ये तर सामान खरेदी करत असताना अचानक सामानासकट शेल्फही कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुपरमार्केटमध्ये घडलेल्या या अपघातामध्ये साधारण 8 लोक गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ब्राझिलमधल्या सुपरमार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-...अन् अंतराळात झाला जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार हे शेल्फ कसं कोसळलं आणि त्याची सुरुवात कुठून झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. ही घटना ब्राझिलमधल्या साओ पाऊलो इथल्या मॅटियास अक्रेजो मिक्स सुपरमार्केटमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत मृत्युमुखी झालेला कर्मचारी 21 वर्षांचा असल्याची माहिती मिळाले आहे. शेल्फखाली दबून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शेल्फ कोसळल्यानं मॉलमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

या दुर्घटनेत 3 जणांची प्रकृती गंभीर तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 11:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या