जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: तहानेनं व्याकूळ चिमणी जमिनीवर पडली; शेवटच्या घटका मोजत असतानाच 'देवदूत' आला धावून

Viral Video: तहानेनं व्याकूळ चिमणी जमिनीवर पडली; शेवटच्या घटका मोजत असतानाच 'देवदूत' आला धावून

तहानेनं व्याकूळ चिमणीला पाजलं पाणी

तहानेनं व्याकूळ चिमणीला पाजलं पाणी

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उष्णतेमुळे बेशुद्ध होऊन एक पक्षी जमिनीवर पडला आहे. त्याला पहिल्या नजरेत बघून वाटत होतं की तो आता जगू शकणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 जून : आपण सर्वांनी ऐकलं असेल की एखाद्याला पाणी देणं हे खूप पुण्याचं काम आहे. या गोष्टी लोकांनी फक्त ऐकल्या असतील, तरी हे काम करणारे अगदी मोजकेच लोक असतील. खर्‍या अर्थाने बघितलं तर अशा लोकांमुळेच पृथ्वीवरून माणुसकी कमी होत चालली आहे. पण सर्वच लोक असे आहेत असं नाही, या कलियुगातही अनेक लोक आपली माणुसकी सोडत नाहीत आणि अशा लोकांमुळेच माणुसकी वाचली आहे.. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतकरी नाराज होऊन बसलेला; गाईने केलं असं सांत्वन, Video पाहून चेहऱ्यावर येईल हास्य यंदाच्या कडक उन्हाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जिकडे पाहावे तिकडे वाढत्या उन्हामुळे नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. माणूस असो, प्राणी असो, सर्वजण अस्वस्थ होत आहेत. अशा परिस्थितीत मानवाकडे स्वत:ला थंड ठेवण्यासाठी आणि तहान शमवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु प्राणी आणि पक्ष्यांकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. याच कारणामुळे पक्ष्यांचा तहानेने मृत्यू होत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत आपण त्यांचा आधार बनलं पाहिजे. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.

जाहिरात

आता हा व्हिडीओ तुम्हीच बघा जिथे एका व्यक्तीने तहानलेल्या चिमणीला पुन्हा जीवदान दिलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उष्णतेमुळे बेशुद्ध होऊन एक पक्षी जमिनीवर पडला आहे. त्याला पहिल्या नजरेत बघून वाटत होतं की तो आता जगू शकणार नाही. अशा परिस्थितीत, एक व्यक्ती पाण्याची बाटली काढून चिमणीवर ओततो आणि नंतर ते तिला पिण्यासाठी देतो. जणू काही पाण्याचे थेंब तिच्यासाठी अमृताचं काम करत होते आणि ती लगेचच पुन्हा उठली. खर्‍या अर्थाने पाहिलं तर त्या व्यक्तीने मानवतेचा आदर्श घालून एका चिमणीचे प्राण वाचवले आहेत. @Lap_surgeon नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना देखील या व्यक्तीचा प्राण्यांबद्दलचा दयाळूपणा पाहून खूप आनंद झाला. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. गरजेच्या वेळी अचानक येऊन मदत करणारे देवदूतांपेक्षा कमी नसतात, असं अनेकजण म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात