मुंबई, 30 ऑक्टोबर : कोरोना काळात ऑनलाइन क्लास सामान्य झालं आहे (
Online Classes in Lockdown) . काही ठिकाणी शाळा, कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. पण सर्वच विद्यार्थ्यांसाठी नाही. काही विद्यार्थ्यांची अद्यापही ऑनलाइन शाळा सुरू आहे. ऑनलाइन शाळा असो किंवा मीटिंग असो यासंबंधित बरीच विचित्र प्रकरणं समोर आली आहे. कॅमेरा सुरू असताना काही लोक काही ना काही भलतंच करताना दिसलं. सध्या अशाच एका शिक्षकाची चर्चा होते आहे. ज्या शिक्षकाने ऑनलाइन क्लासदरम्यान मोठी चूक केली (
Professor Mistake During Online Class).
दक्षिण कोरियातील (
South Korea) एका प्राध्यापकाने ऑनलाइन क्लासदरम्यान नको तो प्रताप केला आहे. एरवी कॅमेरा बंद करून शिकवणाऱ्या या शिक्षकाच्या लॅपटॉपचा कॅमेरा त्याच्या नकळत अचानक सुरू झाला आणि त्याचा प्रताप सर्वांसमोर आला. शिकवतानाच शिक्षक विद्यार्थ्यांना अशा अवस्थेत दिसला की पाहून विद्यार्थीही गार हैराण झाले.
हॅनयँग युनिव्हर्सिटीतील (
Hanyang University) प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास देत होते. शक्यतो ते कॅमेरा ऑफ करून शिकवायचे. पण एक दिवस चुकीने त्यांचा कॅमेरा ऑन राहिला आणि त्यांचं पितळ उघडं पडलं. ऑनलाइन क्लासमध्ये ते अचानक बाथरूममध्ये गेले आणि अंघोळ करू लागले. यावेळी त्यांनी लॅपटॉप आपल्यासमोरच ठेवला होता. प्रोफेसर शिकवता शिकवता अंघोळ करताना दिसले.
हे वाचा - '8 वर्षे झाली BF Propose च करत नाही', संतप्त GF ने ठोठावला थेट कोर्टाचा दरवाजा
आपला कॅमेरा सुरू आहे, विद्यार्थी पाहत आहेत, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. प्राध्यापकाला पाहून विद्यार्थीही हैराण झाले. अंघोळीनंतर बाथरूममधून बाहेर पडताचही त्यांनी जसं काही झालंच नाही, असं बिनधास्तपणे शिकवायला सुरुवात केली. आपल्याकडून किती मोठी चूक झाली, हे त्यांंना खूप वेळाने समजलं. तेव्हा त्यांनी संपूर्ण क्लासची माफी मागितली. त्यांनी एक मेल पाठवला.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या शिक्षकाने याआधीसुद्धा असं केलं आहे. एका विद्यार्थ्याने सांगितलं की, याआधी ऑडिओ क्लासमध्ये त्याला पाणी पडत असल्याचा आवाज यायचा. पण कॅमेरा बंद असल्याने प्राध्यापकाकडे नेमकं काय होतं आहे, याचा अंदाज लागत नव्हता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना याआधीसुद्धा प्राध्यापकांनी अशीच ऑनलाइन क्लास सुरू असताना अंघोळ केली असावी असा अंदाज बांधला.
हे वाचा - Shocking! रेस्टॉरंटमधून मागवलं खाणं; डब्यात महिलेला मिळालं कापलेलं डोकं
दरम्यान प्राध्यापकाचा हा प्रताप पाहिल्यानंतर युनिव्हर्सिटीने एक समिती स्थापन केली आहे. प्राध्यापकाने असं का केलं, याचं कारण समजून घेतलं जाईल. यानंतर कदाचित या प्राध्यापकाला नोकरीवरून काढूनही टाकलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.