मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'बाबा पुस्तकाला पैसे देत नाही, रोज दारू पितात'; रडत शिक्षकाला व्यथा सांगत होता चिमुकला, पाहून हसत राहिला बाप, VIDEO

'बाबा पुस्तकाला पैसे देत नाही, रोज दारू पितात'; रडत शिक्षकाला व्यथा सांगत होता चिमुकला, पाहून हसत राहिला बाप, VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा लहान मुलगा वर्गात आपल्या शिक्षकासमोर उभा राहून रडत आपली व्यथा सांगत आहे. शिक्षक या मुलाला विचारतात की तू पुस्तक का विकत घेत नाही?

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपल्या शिक्षकासमोर रडत व्यथा मांडत आहे (Son exposed his Father in Classroom). व्हिडिओमध्ये हा मुलगा आपल्या शिक्षकाला सांगते की त्याचे वडील त्याला पुस्तक घेऊन देत नाहीत, मात्र रोज दारू पितात (Father Drinking Alcohol Everyday). हा मुलगा जेव्हा रडत आपली व्यथा मांडत असतो तेव्हा त्याचे वडिलही तिथेच असतात. हैराण करणारी बाब म्हणजे आपल्या मुलाचं बोलणं ऐकून त्याचे वडील हसत आहेत.

व्हायरल होणारा व्हिडिओ बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील तिलौथू येथील एका सरकारी शाळेतील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा लहान मुलगा वर्गात आपल्या शिक्षकासमोर उभा राहून रडत आपली व्यथा सांगत आहे. शिक्षक या मुलाला विचारतात की तू पुस्तक का विकत घेत नाही? यावर हा मुलगा उत्तर देतो की त्याचे वडील सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करतात मात्र अभ्यासासाठी पुस्तक विकत घ्यायला त्याला पैसे देत नाहीत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिक्षक या मुलाला विचारतात की पाच दिवसांपासून सतत सांगूनही त्याने पुस्तक का घेतलं नाबी. यावर हा मुलगा उत्तर देतो की वडील सर्व पैसे दारु पिण्यासाठी खर्च करतात. यादरम्यान या मुलाचे वडीलही तिथेच उपस्थित आहेत. वडिलांसमोरच हा मुलगा सांगतो की बाबा पुस्तक न घेता सर्व पैसे दारुवर खर्च करतात.

हा व्हिडिओ पतूलकाच्या उत्क्रमित विद्यालयातील असल्याचं समोर आलं आहे. बिहारमध्ये दारूबंदी लागू आहे. यादरम्यानच समोर आलेला हा व्हिडिओ अनेक प्रश्न उपस्थित करतो. व्हिडिओमध्ये या मुलाची बहिणही दिसते. शिक्षकासमोरच त्याची बहिणही सांगते की तिचे वडील सर्व पैसे दारूमध्येच खर्च करतात. मात्र नंतर या मुलांचे वडील पुस्तक खरेदी करून देण्यास तयार होतात.

First published:

Tags: Illegal liquor, Shocking video viral