इंदूर, 21 नोव्हेंबर : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कलेक्टर मनीष सिंह यांनी सांगितलं की, येथे कोरोनाच्या तिसरी लाटेसारखी परिस्थिती आहे. येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्याचा एक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इंदूर पोलीस रस्ते व ठिकठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना पकडून गाडीत भरत आहेत. यावेळी अनेक लोक रडतात...एका तरुणाने पोलीस घेऊन जात असल्याने रस्त्यावर बसून घेतलं..एकाला तर पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं. असा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंदूरमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांसाठी एक छोटेखानी तात्पुरता तुरुंग तयार करण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्या तरुणांना गाडीत भरून या तुरुंगात काही काळासाठी ठेवलं जातं.
येथील खासगी रुग्णालयातील 90 टक्के बेड्स फूल आहेत. त्यामुळे रुग्णांना सुपर स्पेशालिटीसह अन्य सरकारी रुग्णालयात हलविण्यात येत आहे. दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये वाढलेली गर्दी आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये उसळी आल्यानंतर इंदूरमधील पोलीस अॅक्शनमध्ये. मास्क न घालणाऱ्या नागरिकांचे असे केले हाल..एकदा हा VIDEO पाहाच pic.twitter.com/hFIHvKm3zV
— News18Lokmat (@News18lokmat) November 21, 2020
हे ही वाचा-बलात्काराच्या आरोपामुळे तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त; 7 वर्षांनंतर झाला मोठा खुलासा
शुक्रवारी मध्य प्रदेशात एकाच दिवसात 1500 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मात्र राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करणार नसल्याचं सांगितलं. मात्र 5 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. कोरोनाचा धोका पाहता मध्य प्रदेश सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आणि राजधानी भोपाळसह 5 शहरांमध्ये नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे.