बलात्काराच्या आरोपामुळे इंजिनिअर तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त; 7 वर्षांनंतर DNA टेस्टमुळे झाला मोठा खुलासा

बलात्काराच्या आरोपामुळे इंजिनिअर तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त; 7 वर्षांनंतर DNA टेस्टमुळे झाला मोठा खुलासा

बलात्काराच्या आरोपामुळे संतोष अनेक दिवस तुरुंगात होता..अखेर 7 वर्षांनंतर त्याला न्याय मिळाला आहे

  • Share this:

चेन्नई, 21 नोव्हेंबर : तामिळनाडूतील चैन्नईमध्ये (Chennai) एका तरुणावर बलात्काचा (Rape) आरोप होता. आरोपानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. 7 वर्षांपर्यंत त्याला बदनामी सहन करावी लागली. त्याची इंजिनिअरिंगची डिग्रीही गेली आणि तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. आता तरुणावरील बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे समोर आले आहे. आणि आरोप लावणाऱ्या तरुणीला 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. संतोष नावाच्या तरुणावर एका तरुणीने बलात्काराचा खोटा आरोप लावला होता. त्यानंतर तरुणी गर्भवती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र डीएनए टेस्टवरुन (DNA Test) ते बाळ संतोषचं नसल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर संतोषने कोर्टात तरुणीकडून नुकसान भरपाईची मागणी केली.

संतोषने कोर्टात सांगितलं की, बलात्काराच्या आरोपानंतर करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त झालं. त्याने तरुणीकडे 30 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. संतोषने आपल्या केसमध्ये तरुणी, तिचे पालक आणि त्याच्या केसचा तपास करणारे पोलीस इन्स्पेक्टर यांना वादी बनवलं आहे. संतोषचे वकील सिराजुद्दीन यांनी सांगितलं की, तरुणी व तिचे कुटुंब संतोषचे शेजारी होते. दोघेही एकाच जातीचे आहेत. दोन्ही कुटुंबानी लग्नाची बोलणी केली व कुटुंबदेखील याला तयार झाले. दोन्ही कुटुंबामध्ये सर्व ठीक होतं. मात्र काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये संपत्तीवरुन वाद निर्माण झाला.

हे ही वाचा-सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार

संतोष आणि त्याच कुटुंब चेन्नईमध्ये दुसऱ्या भागात जाऊन राहू लागले. संतोषने एका खासगी इंजिनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो येथून बीटेक करीत होता. यादरम्यान तरुणीच्या आईने संतोषच्या कुटुंबाशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की, संतोष आणि त्यांच्या मुलीचं लवकरात लवकर लग्न करून द्या..संतोषने या लग्नासाठी नकार दिल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात बलात्काराची केस दाखल केली.

90 दिवस तुरुंगात

संतोषला पोलिसांनी अटक केली. त्याला 12 फेब्रुवारी 2010 रोजी 95 दिवसांपासून ताब्यात घेत तुरुंगात पाठविण्यात आलं. 3 महिन्यांनंतर संतोष जामीनावर बाहेर आला. त्यावेळी संतोषला कळलं की तरुणीने एका मुलीला जन्म दिला आहे. संतोषने मुलीच्या डीएनए टेस्टची मागणी केली. एकीकडे संतोष विरोधात ट्रायल सुरू झालं. डीएनए टेस्टमध्ये ती मुलगी संतोषची नसल्याचे समोर आले. कोर्टाने संतोषवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: November 21, 2020, 4:47 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या