हिप्पोपोटॅमसच्या मस्तीचा VIDEO व्हायरल, एकाने अशी ओढली दुसऱ्याची शेपटी

हिप्पोपोटॅमसच्या मस्तीचा VIDEO व्हायरल, एकाने अशी ओढली दुसऱ्याची शेपटी

दोन Hippopotamus चा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ सिनसिनाटी प्राणी संग्रहालयातील (Cincinnati Zoo) आहे.

  • Share this:

सिनसिनाटी, 11 जुलै : प्राण्याचे विश्व जरा वेगळेच असते. त्यांचे व्हिडीओ देखील पाहण्यासारखे असतात. त्यांच्या मनात कधी काय येईल हे देखील सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्याला पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. प्राण्यांची मैत्री देखील खोडकर असते हे या व्हिडीओतून जाणवत आहे. दोन Hippopotamus चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनसिनाटी प्राणी संग्रहालयातील (Cincinnati Zoo) हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये चक्क एका Hippopotamus त्याच्या सवंगड्याची गंमत करण्यासाठी त्याची शेपटी दाताने ओढली आहे.

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या हिप्पोचे नाव फियोना आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. सिनसिनाटी प्राणी संग्रहालयाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानी 'नॉटी फियोना' असे कॅप्शन दिले आहे. फियोना गुहेतून बाहेर पडते आणि पाण्यात उतरण्यााधी दुसऱ्या Hippopotamus शेपटी ओढते. त्यानंतर आरामात पाण्यात उतरते.

(हे वाचा-अन् तिच्यासाठी कोरोना योद्धा डॉक्टर गायक झाला; हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच)

View this post on Instagram

Naughty Fiona! #TeamFiona

A post shared by Cincinnati Zoo (@cincinnatizoo) on

60 पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. लोकांना Hippopotamus ची मस्ती खूप आवडत आहे. यावर खूप जणांनी कमेंट्स केल्या आहेत. फियोनाचे आणखी व्हिडीओ आणि फोटो देखील या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओवर फियोनाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

(हे वाचा-एकीचे बळ! म्हशींच्या कळपासमोर जंगलाच्या राजाला काढावा लागला पळ, VIDEO VIRAL)

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 11, 2020, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading