मुंबई 06 डिसेंबर : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे. जिथे आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ, फोटो किंवा माहिती मिळते. इथे अनेक लोक माहिती मिळवण्यासाठी येतात. पण असे अनेक लोक आहेत. जे काही व्ह्यूज किंवा फॉलोअर्स मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. या प्रसिद्धीसाठी अनेक लोक कसलाही विचार करत नाहीत. अनेकांनी अशामुळे आपले प्राण देखील गावले आहे. तर काहींना कायद्याने शिक्षा झाल्याच्या देखील अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असणार. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. जे चर्चेचा विषय ठरला आहे. चर्चाच काय तर हे वादग्रस्त देखील ठरलं आहे. हे ही पाहा : किती तो निरागसपणा! आधी मेणबत्ती फुकता येत नव्हती, मग जेव्हा फुकली तेव्हा… Video Viral खरंतर एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुणी राज्यपालांच्या खूर्चीमगे उभी राहिली आहे. तिने राज्यपालांच्या खूर्चीमागे फोटोशूट केलं, जे खूपच चुकीचं आहे. तिने हा राज्यपाल या पदाचा अपमान केलं असल्याचं अनेकांचं मत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात, पण घटनात्मक गोष्टींना असं मनोरंजन म्हणून वापर कारण फारच चुकीचं आहे. या तरुणीचे नाव मायरा मिश्रा आहे. ती एक मॉडल आहे. तिने हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटला शेअर केला आहे. ज्याला भरभरुन लाईक देखील मिळाले आहेत. पण तिने केलेलं हे कृत्य अपमानास्पद आहे. असं अनेकांचं म्हणणं आहे.
आता तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थीत झाला असेल की ती आत गेलीच कशी?
असं सांगितलं जात आहे की, राज्यपालांच्या एका गेस्टसोबत ती राजभवनात गेली होती. तेव्हा तेथे सूरक्षा रक्षकाची नजर चुकवून तिने फोटो शूट केलं असल्याचं सुत्रींनी सांगितलं आहे. राज्यपालांच्या खु्र्चीमागे उभं राहत मायरा मिश्रानं फोटोशूट केलंय…राज्यपाल पद हे संवैधानिक पद आहे…अशा प्रकारे राजभवनात फोटो शूट करत मायरा मिश्रा या मॉडेलनं राज्यपालपदाचा अवमान केलाय…
आता यावर काय ऍक्शन घेण्यात येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.