क्वालालांपूर, 11 फेब्रुवारी : साप (Snake video) म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. असा हा साप आकाशात उडणाऱ्या विमानात दिसला तर काय होईल?. अशीच एक घटना समोर आली आहे. मलेशियात एका विमानात साप घुसला. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. हा साप कुठून आणि कसा आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही (Snake in plane). एके5748 ही फ्लाइट क्वालालांपूरहून तवाऊला जाण्यासाठी निघालं. जसं विमान आकाशात झेपावलं. तसं केबिन लाइटमध्ये काहीतरी हलत असल्याकडे सर्वांचं लक्ष गेलं आणि सर्वांनाच धक्का बसला. केबिन लाइटमध्ये एक साप सरपटताना दिसला. त्यानंतर पायलटने विमानाचं एमर्जन्सी लँडिंग केलं.
An AirAsia flight from Kuala Lumpur to Tawau was forced to change course after a snake was seen on board.
— TheVibes.com (@thevibesnews) February 11, 2022
To avert any untoward incidents involving passengers and crew, the flight was diverted to Kuching.
Here, the reptile is seen moving very slowly behind a translucent panel. pic.twitter.com/dAhCFAlppE
वन इंडियाने टीआरपी न्यूजच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, चीफ सेफ्टी ऑफिसर कॅप्टन लियोंग तियेन यांनी सांगितलं, एअर एशियाला याबाबत माहिती आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. कोणत्याही विमानात असं होऊ शकतो. पायलटने योग्यवेळी योग्य पाऊल उचललं. कुणालाही काही हानी पोहोचलेली नाही. हे वाचा - बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि…; अंगावर काटा आणणारी घटना साप विमानात कसा घुसला याबाबत माहिती मिळालेली नाही. हा साप स्वतःहून केबिननमध्ये गेला की कोणत्या प्रवाशाच्या सामानातून गेला, की कोणता प्रवासी त्याला घेऊन आला, हे समजलं नाही.