जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भयानक दृश्य! डोकं धडावेगळं होताच स्वतःलाच चावू लागला साप अन्..; हा Video पाहून थरकाप उडेल

भयानक दृश्य! डोकं धडावेगळं होताच स्वतःलाच चावू लागला साप अन्..; हा Video पाहून थरकाप उडेल

स्वतःलाच चावू लागला साप

स्वतःलाच चावू लागला साप

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की जखमी सापापेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही. साप स्वतःच्या शरीरावर हल्ला करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 जून : जवळपास सगळ्यांना सापाची भीती वाटते. तरीही काही लोक सापासोबत खेळताना दिसतात. सापासोबत कलाबाजी करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी आता असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला घाबरवेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की जखमी सापापेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही. साप स्वतःच्या शरीरावर हल्ला करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? होय, या व्हिडिओमध्ये एक साप स्वतःला चावत असल्याचं दिसत आहे. National News: चक्रीवादळाचा असाही परिणाम! एकाच रात्री 19 लोकांना सर्पदंश; परिसरात खळबळ सोशल मीडियावर अनेकदा सापांचे भयानक व्हिडिओ व्हायरल होतात. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सापाचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे, परंतु असं असूनही त्याच्या शरीरात जीव कायम आहे. डोकं शरीरापासून वेगळं झाल्यानंतरही हा साप तडफडत आहे. या सापाचं कापलेलं डोकं त्याच्या शरीरापासून काही अंतरावर पडल्याचं व्हिडिओत पुढे दिसत आहे. त्यानंतर अचानक या सापाच्या मागील भागाला त्याच्या छाटलेल्या डोक्याला स्पर्श होतो. यानंतरचं दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.

यानंतर अचानक त्या सापाचं कापलेलं डोके जिवंत होतं आणि तो आपलं तोंड उघडून स्वतःच्या शरीराच्या मागील भागावर जोरात चावा घेतो. हे दृश्य हैराण करणारं आणि अंगावर काटा आणणारं आहे. हे संपूर्ण दृश्य एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासारखं वाटत असलं तरी हा व्हिडिओ खऱ्या घटनेचा आहे. तुटलेल्या डोक्यातील तोंड उघडून, साप स्वतःच्या शरीराचा मागचा भाग धरून ठेवतो आणि जोरात चावतो. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की कोणीही घाबरून जाईल. सापाचं डोकं जरी कापलं तरी तो हल्ला करण्यासाठी सक्षम असल्याचं यात दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात