भरतपूर, 8 जून: कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं देशात (Corona Second Wave) चिंताजनक स्थिती आहे. काही राज्यांमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा अद्यापही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. बुरशीजन्य आजार वाढल्यानं सर्वत्र बिकट स्थिती आहे. दरम्यान, एका कोरोना केंद्रामध्ये (Corona Centers) तब्बल 6 फूट लांब साप घुसल्यानं चांगलीच खळबळ उडाली. अगोदरच कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांसमोर हे दुसरं संकट आलं होतं. कोविड केंद्रात साप असल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही चांगलेच घाबरले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून काहींनी हा साप टेस्ट करण्यासाठी आला असेल असं गमतीनं म्हटलं आहे.
या प्रकाराची वन विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांच्या कर्मचार्यांनी येऊन हा साप पकडला. त्यानंतर सर्वांनाच हायसं वाटलं. हा सर्व प्रकार राजस्थानमधील भरतपूर येथील एका महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये घडला आहे.
हे वाचा - कोरोनानं आर्थिक घडी विस्कटली; दुसऱ्या लाटेत करोडोंनी गमावल्या नोकऱ्या, 97% कुटुंबाचं उत्पन्न घटलं
भरतपूरच्या महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये तब्बल सहा फूट लांब साप घुसल्यानं गोंधळ उडाला. बेडवर असलेल्या कोरोना रुग्णांसमोर हे आणखी एक नवं संकट आलं होतं. कोरोना केंद्राकडून याबाबत वन विभागाला तातडीनं माहिती दिल्यानंतर जवळच असलेल्या केवलादेव राष्ट्रीय उद्यानातील काही कर्मचार्यांनी येऊन शोध मोहीम राबवली. त्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर या सापाला सुरक्षितरित्या पकडले. सुदैवानं कोरोना केंद्रामध्ये कोणावरही सापाने हल्ला केला नाही, अन्यथा समस्या आणखीनच बिकट झाल्या असत्या. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापाला पकडून त्यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये त्याला सोडण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Video viral